शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

लपाचे ७२५ प्रकल्प नादुरूस्त

By admin | Updated: May 21, 2016 01:43 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत.

११८८ तलावांना दुरुस्तीची गरज१७३८ विहिरी लवकरच बांधणारजिल्ह्यात १४२१ मामा तलावनरेश रहिले गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत. त्यापैकी ७२५ प्रकल्प नादुरूस्त आहेत. १९० लघु सिंचन तलावपैकी १०७ नादुरूस्त, २९४ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी ११५ नादुरूस्त, १२ उपसा सिंचनापैकी ९ उपसा सिंचन नादुरूस्त, २६ पाझर तलावांपैकी ६ नादुरूस्त, १३४९ साठवण बंधाऱ्यांपैकी १३३ नादुरूस्त, माजी मालगुजारी १४२१ तलावांपैकी ३५५ तलाव नादुरूस्त असल्याची माहिती संबधित विभागाने दिली. यामुळे सिंचनाच्या सोयी करण्यास लघु पाटबंधारे विभाग कसा उदासीन आहे याची प्रचिती येते.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणारा असला तरी या जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी सोयीस्कर म्हणून माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के मामा तलावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावांपैकी ११८८ तलावांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु दुरूस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी पाणी पुरत नाही. परिणामी हे मामा तलाव हिवाळ्यातच कोरडे पडतात.जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १९० लघुसिंचन तलाव, २९४ कोल्हापुरी बंधारे, १२ उपसा सिंचन योजना, २६ पाझर तलाव, १३४९ साठवण बंधारे तर १४२१ माजी मालगुजारी तलाव आहेत. एप्रिल महिन्यात या पैकी २५ टक्के मामा तलावात ३० टक्के पाणी होते. २५ टक्के तलावांमध्ये १० टक्के पाणी तर ५० टक्के तलाव कोरडे पडले होते. आता मे ८० टक्के तलावात थेंबभर पाणी नाही स्थिती झाली आहे.३९५१ पैकी १६४७ विहिरींचे काम पूर्णशासनाने जवाहर विहिरींची योजना सन २००८ मध्ये अमंलात आणली. योजना सुरू झाल्यापासून एप्रिल २०१६ पर्यंत शासनाने गोंदिया जिल्ह्यात ३ हजार ९५१ विहिरी मंजूर केल्या. मात्र यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे गोंदिया जिल्ह्यात फक्त १ हजार ६४७ विहिरींचे काम करण्यात आले. ५६६ विहिरींचे काम सुरू असून १ हजार ७३८ विहिरींच्या बांधकामाची सुरूवात करण्यात आली नाही.तालुकानिहाय अपूर्ण असलेल्या विहीरीआमगाव तालुक्यात १४२ विहिरींच्या कामाला सुरूवातच केली नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यात २३६, देवरी तालुक्यात १३६, गोंदिया तालुक्यात २५३, गोरेगाव तालुक्यात ४५०, सडक अर्जुनी तालुक्यात १२०, सालेकसा तालुक्यातील १४१, तिरोडा तालुक्यातील २७८ विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही. जिल्ह्यात ३९५१ विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी १६४७ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर ५६६ विहिरींचे काम प्रगतिपथावर आहेत. १७३८ विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही, हे विशेष.