शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

७२ लाखांचे सोने गायब

By admin | Updated: January 7, 2017 02:07 IST

गोंदिया रेल्वे स्थानकातून रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेसच्या बोगी एस-६ मधील प्रवासी भरत दुलीचंद जैन (३८) रा. मुंबई

दुसऱ्या आरोपींच्या शोधात पोलीस : सोलापूरच्या तीन आरोपींकडून काहीही मिळाले नाही गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकातून रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेसच्या बोगी एस-६ मधील प्रवासी भरत दुलीचंद जैन (३८) रा. मुंबई यांच्या ७२ लाख रूपये किमतीच्या झालेल्या सोन्याच्या चोरीचा अद्याप काहीही सुगावा लागला नाही. २० आॅक्टोबरला दुपारी झालेल्या या चोरीच्या संशयावरून रेल्वे पोलिसांनी तीन व्यक्तींना पकडले. परंतु त्या व्यक्तींजवळून न सोने मिळाले न कोणतीही रोख रक्कम. त्यामुळे सदर तिघांना सोडून देण्याची पाळी पोलिसांवर आली. शेवटी हे सोने कुठे गायब झाले, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. १९ आॅक्टोबरला मुंबईवरून सोने विक्रीसाठी गोंदियात आलेल्या भरत यांनी त्याच दिवशी बालाघाटला जावून सोने व्यापाऱ्यांची भेट घेतली व गोंदियाला परत आले. दुसऱ्या दिवशी २० आॅक्टोबरला ते रायपूरला जाण्यासाठी निघाले. परंतु जेव्हा ते गोंदिया रेल्वे स्थानकावरून इंटरसिटी एक्सप्रेच्या बोगी एस-६ मध्ये बसले, ट्रेन सुटताच ते लघुशंकेसाठी गेले. या दरम्यान त्यांच्या बॅगमधून काही लोकांनी सोने गायब केले. या संदर्भात गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला व तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाला तहसीलच्या तीन व्यक्तींना वेगवेगळ्या दिवसी ताब्यात घेतले. यात करमाला तालुक्याच्या सालसे गावातील रहिवासी पप्पू उर्फ शरद रामा काले (२८), जेऊर येथील रहिवासी रविंद्र बलभीम भुजरतकर (६५) व सालसे येथील रहिवासी हर्षद उर्फ चंद्रकांत रामा काले (३२) यांचा समावेश आहे. त्यांना नागपूर येथील रेल्वे न्यायालयात सादर केल्यानंतर सोने जप्तीसाठी त्यांना त्यांच्या गावी पोलिसांनी नेले. परंतु त्यांच्याजवळून सोने जप्त होवू शकले नाही. त्यामुळे त्यांना सोडणे भाग पडले. आता पुन्हा त्याच गावातील काही आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्या आरोपींकडून पोलीस सोने जप्त करू शकले नाही तर त्यांना सोडावे लागू शकते. त्यामुळे खूप सतर्कतेने पोलिसांना आता आरोपी पकडावे लागतील. (प्रतिनिधी) करमाला येथीलच रहिवाशांवर संशय का? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत जैन यांच्यासह त्यांचा एक सोबत्याचा कधीतरी वाद झाला होता. तो सोबती करमाला तालुक्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी जेव्हा करमाला येथील रहिवाशांबाबत चौकशी केली तर फिर्यादीने सांगितले की, एकदा त्यांच्यासह वाद झाला होता. तो व्यक्ती भरत यांच्यासह गोंदियालासुद्धा आलेला आहे. त्यामुळे याच तालुक्यातील रहिवाशांचा हात या चोरीत असावा, असा पोलिसांना संशय आहे. या सर्व बाबींवर पोलीस कार्य करीत आहे की, आरोपींची संख्या एकापेक्षा अधिक आहे व त्यांना आधीच ही बाब माहीत होती की भरत कुठून व कसे जातो. याच आधारावर त्यांनी आपला षडयंत्र रचून चोरीची घटना घडविली. रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक संजयसिंह वारंवार पुणे व सोलापूरच्या चकरा याच चोरीच्या तपासकार्यासाठी करतात.