शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया व तिरोडा नगराच्या विकासासाठी ७.१८ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

गोंदिया व तिरोडा या दोन नागरी क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने खासदार पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधून दोन्ही जिल्ह्यांतील नगरपंचायत व नगर परिषदांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया व तिरोडा नगराच्या खुंटलेल्या विकासाला चालना मिळावी यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नगरविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करीत दोन्ही जिल्ह्यांतील नागरी संस्थांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे नगरविकास मंत्रालयाने विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण लेखाशिर्षकांतर्गत गोंदिया व तिरोडा दोन्ही नगर परिषदांकरिता ७.१८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसह अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहेत. गोंदिया व तिरोडा या दोन नागरी क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने खासदार पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधून दोन्ही जिल्ह्यांतील नगरपंचायत व नगर परिषदांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या अनुरूप नगरविकास मंत्रालयाने वैशिष्ट्यपूर्ण व विशेष रस्ता अनुदान लेखाशिर्षकांतर्गत तिरोडा व गोंदिया या दोन्ही नगर परिषदांकरिता ७.१८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेकरिता ४५ लाख व तिरोडा नगर परिषदेकरिता ३२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विशेष रस्ता अनुदान या लेखाशिर्षकांतर्गत गोंदिया नगर परिषदेकरिता १.४१ कोटी व तीन कोटी २४ लाख ४० हजार रुपये तसेच, तिरोडा नगर परिषदेकरिता एक कोटी नऊ लाख ८० हजार व एक कोटी १० लाख असा दोन्ही नगर परिषदेकरिता विशेष रस्ता अनुदान अतंर्गत ६.६४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण व विशेष रस्ता अनुदान या दोन्ही योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही नगर परिषदांना ७ कोटी ६२  लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून गोंदिया व तिरोडा शहराच्या विकासकामांना गती मिळणार आहे. गोंदिया व तिरोडा या दोन्ही शहरांच्या विकासकामांसाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खासदार पटेल यांचे लक्ष वेधले होते, हे विशेष.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल