शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के तरूण व्यसनाधीन

By admin | Updated: June 26, 2017 00:18 IST

कौटुंबिक कलह, ताण, इच्छापूर्तीचा अभाव व वाईट संगत तरूण पिढीची मानसिकता बिघडवत आहे.

व्यसनाला त्यागतात ४० टक्के लोक : ९० टक्के लोक डिप्रेशनमध्ये नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कौटुंबिक कलह, ताण, इच्छापूर्तीचा अभाव व वाईट संगत तरूण पिढीची मानसिकता बिघडवत आहे. साधारणत: ९० ते ९५ टक्के लोक आजघडीला डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे ते व्यसनाकडे वळत आहेत. गोंदिया जिल्ह्यात तंबाखू, पान-मसाला, दारू व अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या ९५ टक्याच्या घरात आहे. बाहेकर व्यसन मुक्ती केंद्र सन २००० मध्ये सुरू करण्यात आले असून या केंद्रात सन २००१ पासून आतापर्यंत १८४३ लोकांना दाखल करण्यात आले. यातील ४० ते ४५ लोकांनी व्यसन सोडले आहे. काही वर्षापूर्वी व्यसन हा शब्द मध्यमवर्गीयांपासून दूर होता. आज मध्यमवर्गीयांमध्येही मोठ्या प्रमाणात व्यसन केले जाते. जिल्ह्यात पान खान्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु पानमसाला, तंबाखू व खर्राच्या शौकीनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेल्वे स्थानकावर कचरा गोळा करणारे तसेच भीख मागणारी बालके सोल्यूशन व पेट्रोलची नशा करतात. व्यसनामुळे बालकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात व्यसन करणाऱ्यांमध्ये पुरूष वर्गच नव्हे तर उच्च शिक्षित महिला सुद्धा व्यसनाधीन होत आहेत. शाळा-महाविद्यालयातील बालके व्यसनाधीन होत आहेत. सातव्या वर्गापासून बालके पानमसाला, तंबाखू, खर्रा, बिडी-सिगारेटच्या अधिन होतात. सुरूवातीला आनंद घेण्याच्या नादात ते त्या व्यसनाच्या आहारी जातात. व्यसनासंदर्भात त्यांची जिज्ञासा, दबाव, अनुकरण, प्रयोगशीलता, मनातील भ्रमाला जबाबदार धरले जाते. हे आनुवंशिक कारणही आहे. व्यसनामुळे मानसिकता बिघडते. व्यसनामुळे शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात. व्यसनमुक्तीच्या उपचाराबरोबर समूपदेशन करणे गरजेचे आहे. धूम्रपान सोडल्यावर धमनीच्या हृदयरोगाचा धोका ५० टक्याने कमी होतो, असे आरोग्य विभागाच्या विशेषतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड मधून येतात सोल्युशनचे व्यसनी बाहेकर व्यसन मुक्ती केंद्रानुसार, गोंदिया जिल्ह्यात दारूच्या व्यसनाचे सर्वाधिक लोक आहेत. दारूमुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यातील चरसग्रस्त लोक व्यसन सोडण्यासाठी येथे येतात. शेजारच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातून सोल्युशन व गांजाचे व्यसनाधीन लोक येत असतात. हे आहेत व्यसनांचे प्रकार जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यू.एच.ओ.) लोकांमध्ये ५५ प्रकारचे व्यसन आढळते. यात तंबाखू, गुटखा, खर्रा, बिडी, सिगरेट या व्यतिरिक्त अमली पदार्थात भांग, चरस, अफीम, गांजा, हशीश, मारिजुआन मॉर्फिन, ब्राउन शुगर, गर्द, कोकेन, एल.एस.डी., झोपेच्या गोळ्या, बेंजोडाइजेपिन, ग्लू, रॉकेल, व्हाइटनर, स्टीरॉइड्स, पेट्रोल, सोल्यूशन, आयोडेक्स यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशच्या बालाघाट व लांजी येथे दारू, गांजा तर वर्धा व नागपूर मध्ये ब्राऊन शुगर, दारू तसेच भंडारा येथे दारू चा उपयोग केला जातो.