शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

७०९ शाळा झाल्या प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:15 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत आतापर्यंत जिल्ह्यातील १०६९ पैकी ७०९ शाळा प्रगत केल्या.

ठळक मुद्दे२५ निकष झाले शिथील : ३६० अप्रगत शाळांचे प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत आतापर्यंत जिल्ह्यातील १०६९ पैकी ७०९ शाळा प्रगत केल्या. २५ मुद्द्यांच्या निकषांवरून या शाळा प्रगत झाल्याचे ठरविण्यात आले. अप्रगत शाळांची संख्या बरीच असून १४ जुलै २०१७ रोजी आलेल्या नवीन आदेशानुसार उर्वरीत ३६० अप्रगत शाळा प्रगत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून अप्रगत शाळांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला कृतीत उतरवून प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत आहे. शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला. याची फलश्रृती म्हणजे जिल्ह्यातील ७०९ शाळा प्रगत झाल्या आहेत.शासनाने शाळा बोलक्या करण्यासाठी २५ निकष ठेवले होते. परंतु शासनाने १४ जुलै २०१७ ला काढलेल्या शासन निर्णयामुळे आता त्या २५ निकषांना शिथील करण्यात आले. मूलभूत क्षमतेत ७५ टक्के गुण व अभ्यासक्रमावर आधारीत ६० टक्के गुण घेणाºया विद्यार्थ्यास प्रगत समजले जाणार आहे.आधी विद्यार्थी प्रगत, वर्ग प्रगत व शाळा प्रगत केली जात आहे. ज्या शाळेतील ६० टक्के विद्यार्थी प्रगत झाले त्या शाळेला प्रगत समजण्यात येत आहे.शाळा बोलक्या करण्यावर भर६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मूलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण देणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहेत. एकंदरीत सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला.

विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सुलभ व सोप्या पध्दतीचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळा प्रगत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प.गोंदिया.