शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळांच्या ६७८ वर्गखोल्या जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:51 IST

जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : शिक्षण विभाग बिनधास्त

अंकुश गुंडावार ।आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र गंभीर प्रकाराकडे कुणाचेच लक्ष नाही.काही दिवसांपूर्वी जीर्ण इमारत कोसळून अनेकांचा जीव गेल्याची घटना मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमातींचा मुद्दा सर्वत्र पुन्हा एका चर्चेत आला. मात्र यापासून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कसालाही बोध घेतला नाही.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०६९ शाळा असून यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे १ लाखावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे डिजीटलपासून ते सेमी इंग्रजीचे वर्ग आणि कॉन्हवेंट सुरू केले जात आहे. तसेच खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कशा दर्जेदार आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात आहे. मात्र शाळांमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १०६९ शाळांच्या इमारतींपैकी बहुतेक इमारती जीर्णावस्थेत आहेत. जि.प.बांधकाम विभागातर्फे दरवर्षी केवळ या इमारतींची डागडूजी करुन या इमारती योग्य असल्याचे दाखविले जाते. मात्र या सर्व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण ३८१७ वर्गखोल्यांपैकी केवळ २५०८ वर्गखोल्या चांगल्या स्थितीत तर तब्बल ६७८ वर्गखोल्या जीर्णावस्थेत असून त्या केव्हाही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अहवाल जि.प.बांधकाम विभागाने दिला आहे. मात्र यानंतरही शिक्षण विभागासह प्रशासनाला त्यांचे गांर्भिय पटलेले नाही. विशेष म्हणजे या जीर्ण वर्गखोल्यांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांना अद्यापनाचे कार्य सुरूच असल्याची माहिती आहे. या वर्गखोल्यांची स्थिती पाहता त्या त्वरीत पाडून नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करणे गरजेचे असल्याचा अहवाल सर्व शिक्षा अभियानाच्या बांधकाम विभागाने जि.प.शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. यावर शिक्षण विभागाने कुठलीच उपाय योजना सुरू केल्या नसल्याची माहिती आहे.अनेक शाळांचे बांधकाम ३५ वर्षांपूर्वीचेजिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारतीचे बांधकाम ३० ते ३५ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे काही जीर्ण झालेल्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करणे अपेक्षीत आहे. मात्र जि.प. प्रशासनासह शिक्षण विभागाचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे.बांधकामासाठी हवा १० कोटी रुपयांचा निधीजिल्ह्यातील जि.प.शाळा इमारतींची दुरूस्ती आणि नवीन वर्गखोल्या बांधकामाकरिता १० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र ऐवढा निधी उपलब्ध होत नसल्याने वर्गखोलींचे बांधकाम रखडल्याची माहिती या विभागाच्या अधिकाºयांनी दिली.