शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

६७ करधारकांची नावे हटविली

By admin | Updated: June 10, 2016 01:51 IST

गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील ६७ करधारकांनी घर टॅक्स न भरल्यामुळे ग्रामपंचायतने त्यांची नावे नमूना-८ प्रमाणपत्रावरून हटविले.

कुऱ्हाडी गावाचे प्रकरण : करधारक ग्रामस्थांच्या अधिकारावर ग्रामपंचायतने आणली गदागोंदिया: गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील ६७ करधारकांनी घर टॅक्स न भरल्यामुळे ग्रामपंचायतने त्यांची नावे नमूना-८ प्रमाणपत्रावरून हटविले. त्यामुळे त्यांच्या मालकीच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. जिल्ह्यातील अशा पद्धतीचे हे पहिलेच प्रकरण आहे.या प्रकरणाच्या चौकशीनंतर कुऱ्हाडी ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र घोषित करण्याची पाळी येवू शकते. कुऱ्हाडी ग्रामपंचायत गोरेगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरातून आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतला आतापर्यंत फुले-शाहू-आंबेडकर दलित वस्ती सुधारणा व विकास अभियान, गौरव ग्रामसभा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, आबासाहेब खेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभागस्तरीय अशाप्रकारे पाच पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत. या पुरस्कारांतून कुऱ्हाडी ग्रामपंचायतला ९ लाख ५५ हजार रूपये पुरस्कार रक्कम मिळाली होती. यापैकी पाच लाख ७६ हजार १२४ रूपये विविध विकास कार्यांवर खर्च करण्यात आले. परंतु गावातील असे ६७ करधारक आहेत, ज्यांनी मागील तीन वर्षांपासून ग्रामपंचायतला कर दिले नाही. अशा करधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ग्रामपंचायत सचिवाने या निर्णयाला पारित करण्यापूर्वी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर सल्ला दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्रि निर्णय घेवून ६७ करधारकांची नावे नमूना-८ मधून हटविले. त्यामुळे सदर सर्व करधारकांच्या न्याय्य अधिकार व मालकी अधिकारांवरच गदा आली आहे. नमूना-८ मधून संबंधित कार्य ग्रामपंचायतने केले आहे. नमूना-८ मधून संबंधित करधारकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत प्रशासनाने सन २०१४-१५ व सन २०१५-१६ मध्ये त्यांना टॅक्सपासून वंचितही ठेवण्यात आले आहे. टॅक्सपासून वंचित ठेवण्यात आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला जवळपास दोन लाख ५२ हजार ३० रूपये ५० पैशांचे नुकसान सहन करावे लागले. जेव्हा गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायतकडून माहितीच्या अधिकारात विविध विषयांची माहिती मागितली तेव्हा हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणात ग्रामपंचायतचे सर्व नऊ पदाधिकारी दोषी आढळले आहेत. (प्रतिनिधी)