शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ६५ लाखांचा तोटा

By admin | Updated: January 7, 2017 02:01 IST

नोटबंदीमुळे प्रत्येक व्यापारावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. हा परिणाम व्यापारी,

नोटाबंदीचा परिणाम : ४ हजार वाहनांऐवजी धावतात २ हजार वाहने गोंदिया : नोटबंदीमुळे प्रत्येक व्यापारावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. हा परिणाम व्यापारी, छोटे विक्रेता किंवा नागरिकांवरच पडला नसून शासनाच्या महसूलावर देखील मोठ्या प्रमाणात पडला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे महिनाभरात ६५ लाखाने उत्पन्न घटले असल्याची वास्तविकता पुढे आली आहे. केंद्रसरकारने ८ नोव्हेंबर रोजी चलनात असलेल्या ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यामुळे व्यापारावरच नव्हे तर सर्वांच्या कामावर विपरीत परिणाम पडला आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या नोट बंदीचा परिणाम व्यापारावरच नाही तर शासनाच्या महसूलावरही पडला आहे. गोंदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत शासनाला प्रत्येक महिन्याला ३ कोटी ५० लाखाचा महसूल मिळतो. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या देवरी (शिरपूरबांध) येथील सिमा तपासणी नाक्यावरून दररोज ४ हजार वाहने धावत असत. परंतु नोेटबंदीमुळे या सिमा तपासणी नाक्यावरून फक्त २००० वाहने दिवसाकाठी धावत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूलात घट झाली आहे. सरकारने नोटबंदी केली तेव्हा आरटीओने जून्या नोटा स्वीकारण्याचे आवाहन केल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात जून्या नोटांमुळे महिन्याच्या सरासरीत ४० लाखाने वाढ झाली होती. परंतु डिसेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत ६५ लाखाने तोटा झाला आहे. दरवर्षी महसूलाच्या २० टक्के उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु यंदा सन २०१५ च्या महसूलाच्या तुलनेत ६५ लाखाने घट झाली आहे. २० टक्के वाढ गृहीत धरली तर एका महिन्यात ७७ लाखाने या कार्यालयाचे महसूल कमी आले आहे. डिसेंबर महिन्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २ कोटी ४५ लाख रूपयाचा महसूल दिला आहे.