शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

64 जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांचा कालावधी शिल्लक : ग्रामपंचायत निवडणूक, सभा बैठकांचे सत्र झाले सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. मात्र यापूर्वी केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल होते. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्याने अर्ज दाखल करता आले नाही. सोमवारी (दि.२८) जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही अर्ज भरण्यासाठी वेग आला नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या एकूण १६३४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. मंगळवार आणि बुधवारी या दोनच दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले सेवा केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करुन त्याची मूळ प्रत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे जमा करावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्याची अट ठेवली आहे.त्यामुळे खाते उघडण्यासाठी सुध्दा मतदारांना बरीच पायपीट करावी लागत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर होत असल्याचे बोलल्या जाते.पुढील दोन दिवसठरणार महत्वपूर्णग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर या कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक हे दोन दिवस उमेदवारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.