शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६३ टक्के शाळा प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:32 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचा माणस आहे.

शैक्षणिक क्रांती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमामुळे सुधारतोय शैक्षणिक स्तर नरेश रहिले  गोंदिया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचा माणस आहे. शाळेत भौतिक सुविधाच नव्हे तर विद्यार्थी प्रगत करण्याकडेही लक्ष आहे. जिल्ह्यातील ६३ टक्के शाळा आतापर्यंत शंभर टक्के प्रगत झाल्याचा अहवाला शिक्षण विभागाकडे आहे. आधुनिक विज्ञान युगात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी एका क्लीकवर पाठ्यक्रमाची माहिती मिळावे म्हणून शाळा डिजीटल करण्यात येत आहेत. विद्यार्थी स्मार्ट व्हावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम अमंलात आणला. मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षापर्यंत प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासन व ं स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षणात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम आणण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षण विभागाचा आहे. बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी १०० टक्के विद्यार्थी विकसित करणे, प्रत्येक शाळेत स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर देणे, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पनाशक्तीला गती वाढविण्यासाठी, शैक्षणिक साहित्यावर भर देणे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्यनाकडे आकर्षीत करणे, कठिण विषयात विद्यार्थ्यांना रूची निर्माण करणे, शिक्षकाला विषयात विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करणे या विषयावर भर देण्यात आला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१७ च्या अखेरपर्यंत १०४८ पैकी ६५७ शाळा प्रगत झाल्या आहेत. जिल्ह्यात ज्ञान रचनावाद व नविन तंत्रज्ञानाने विद्यार्थी प्रेरणादायी झाले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती होत आहे. मोठ्या प्रमाणात प्रगत शाळा होत आहेत.यामागे शिक्षकांची अंगमेहनत आहे. लोकसहभागही मिळत आहे. -उल्हास नरड शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प. गोंदिया.