शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

खरिपासाठी ६२ हजार ९०० मेट्रिक टन खत मंजूर

By admin | Updated: June 4, 2017 00:49 IST

शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ६० हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली.

पूर्वतयारीला वेग : महिन्याभरात २४५२.९५ मे.टन खताचा पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ६० हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. यात १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत एका महिन्यात २४५२.९५ मे.टन खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पुरवठा करण्यात आलेला व मागील वर्षाचा शिल्लक साठा मिळून ९९७५.८८ मे.टन खत शिल्लक आहे. सद्यस्थितीत या खताची विक्री झालेली नाही.सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेची युरिया खताची मागणी ३० हजार मे.टन होती. यात २७ हजार ५०० मे.टन मंजूर करण्यात आले. तर ३१ मार्चपर्यंत १७६५.२ मे.टन युरिया शिल्लक होता व ३१ मेपर्यंत २६२ मे.टन पुरवठा करण्यात आला. असा एकूण युरियाचा २०२७.२ मे.टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी खताची मागणी तीन हजार मे.टन असून तीन हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. पूर्वीचा शिल्लक साठा २७३.३५ मे.टन होता. त्यात पुरवठा करण्यात आलेल्या नऊ मे.टनाची भर पडून सध्या २८२.३५ मे.टन साठा शिल्लक आहे. एमओपी खताची मागणी ७२५ मे.टन असून एक हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. ९८.७५ मे.टन मागील शिल्लक असून १९३.९५ मे.टन पुरवठा करण्यात आला. सध्या २९२.७ मे.टन एमओपी शिल्लक आहे. एसएसपी खताची मागणी १२ हजार २०० मे.टनाची होती. १७ हजार ९०० मे.टन मंजूर झाले. शिल्लक साठा दोन हजार २४९ मे.टन असून पुरवठा ४६० मे.टन झाला. असा एकूण शिल्लक साठा दोन हजार ७०९ मे.टन आहे.याशिवाय १५.१५.१५, २०.२०.०, २०.२०.१३, २४.२४.०, १२.३२.१६, १६.१६.१६ या खतांचीही खरिपासाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रासायनिक खतांच्या मागणीला मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. मात्र या खतांचा मागील वर्षाचा काही साठा शिल्लक असल्याचे जि.प. कृषी विभागाने सांगितले आहे. संयुक्त व मिश्र खतेखरिपासाठी जिल्हा परिषदेने १४ हजार ०७५ मे.टन संयुक्त खताची मागणी केलेली आहे. यापैकी १३ हजार १०० मे.टन मंजूर झाले आहे. तर १ एप्रिल २०१७ पर्यंत एक हजार ९५८.९८ मे.टन शिल्लक होते. त्यात ३१ मेपर्यंत एक हजार ३२८ मे.टन पुरवठा करण्यात आल्याने सध्या तीन हजार २८६.९८ मे.टन संयुक्त खताचा साठा शिल्लक आहे. तर मिश्र खताची सध्या मागणी करण्यात आलेली नाही. मात्र १ एप्रिल २०१७ पर्यंत एक हजार १७७.६५ मे.टन मिश्र खताचा साठा होता. तर ३१ मे पर्यंत २०० मे.टन पुरवठा झाल्याने त्यात भर पडून सध्या एक हजार ३७७.६५ मे.टन मिश्र खतांचा साठा शिल्लक आहे.