शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात जाणाऱ्या ६२ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:34 IST

रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देचार वाहने जप्त : १० जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.सालेकसा मार्गावरुन कत्तलीसाठी जनावरे वाहून नेत असल्याची गुप्त माहिती सालेकसा पोलिसांना मिळाली. यानंतर त्यांनी या मार्गावर पाळत ठेवून चार वाहने पकडली. ट्रक एमएच ४० ६१३७ मध्ये ३० जनावरे डांबून ठेवली होती. यात जप्त केलेल्या जनावरांची किंमत एक लाख २० हजार तर ट्रकची किंमत ६ लाख रूपये सांगितली जाते. ट्रक बीजी ०४ जेबी ८४५३ मध्ये ३२ जनावरे डांबून होती. त्या जनावरांची किंमत एक लाख २८ हजार तर ट्रकची किंमत ६ लाख रूपये सांगितली जाते. या जनावरांना कत्तलखान्यात नेण्यासाठी रस्त्यात कुठलीही अडचण होऊ नये, यासाठी त्यांच्या मदतीला पांढºया रंगाची बोलेरो एमपी ५० बीसी १०५० किंमत ४ लाख ५० हजार व काळ्या रंगाची बोलेरो सीजी ११ बीए ४५२७ किंमत ३ लाख हजार ही वाहने होती. सदर जनावरे हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती मिळाली.या प्रकरणात एकूण २२ लाख ४८ हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींध्ये योगेश आनंदराव मडावी (२८) रा. देवरी, देवेंद्र शामराव राऊत (२७) रा.आंबोरा चिचगड, रूकसाद मुनिर पठाण (२७) रा. देवरी, आनंद अनिल जगने (२५) आंबोरा चिचगड, पिरया खान मोहम्मद खान (२८) रा.टिमकीटोला रिशेवाडा (मध्यप्रदेश), समीरउल्ला रहेमतउल्ला खान (३८) रा. मुनसीटोला, अली अमर हुसेन (२८) रिशेवाडा (मध्यप्रदेश), शहबाज मोहम्मद खान (३५) टिमकीटोला बहेला (मध्यप्रदेश), नूरखान उर्फ फुले मोहम्मद खान (४०) टिमकीटोला बहेला, राजू प्रेमलाल मोहबे (४३) रा. चिचटोला (पिपरीया) यांचा समावेश आहे.सदर आरोपींविरूध्द सालेकसा पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१), (ड), (ह) प्राणी संरक्षण अधिनियम ५ अ (१) सहकलम ११९ महाराष्टÑ पोलीस अधिनियम, १८४ मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.तस्करीसाठी गडचिरोली मार्गाचा वापरगोंदिया, बालाघाट, छत्तीसगड येथून जनावरे खरेदी करुन त्यांची कत्तलखान्याकडे वाहतूक करण्यासाठी तस्करांनी गडचिरोली मार्गाचा वापर करीत असल्याची माहिती आहे. या जिल्ह्यात वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेल्या पुलामुळे थेट हैद्राबाद येथे जाता येते. त्यामुळे जनावरांची तस्करी करणारे या मार्गाचा सर्वाधिक वापर करीत असल्याची माहिती आहे.कारवाई टाळण्यासाठी चलाखीजनावरांची तस्करी करण्यासाठी व पोलिसांची कारवाई टाळता यावी. तस्करी करणारे जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनाच्या मागे दोन खासगी चारचाकी वाहने ठेवीत आहे. जनावरांची वाहतूक करताना कुठे पोलिसांची तपासणी सुरू आहे का, याची माहिती या वाहनात बसलेले तस्कर घेत असल्याची माहिती आहे.