शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.जीएसटी लागू ...

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.जीएसटी लागू करण्यापूर्वी कोणत्याही व्यापाºयाशी व्यवहार करता येत होता. मात्र आता जीएसटी भरणाºयाच व्यापाºयाशी व्यवहार करण्याची अट लागू केली आहे. अन्यथा ३६ टक्के दंडाची तरतूद आहे. यामुळे व्यापाºयांना व्यापार करणे कठीण होत आहे. केंद्र सरकारचा जीएसटीच्या माध्यमातून व्यापाºयांच्या नफ्यावर डोळा असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. जीवनाश्क वस्तू वगळता सर्वच व्यापारावर परिणाम झाला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशातील व्यापाºयांना अडचणीत आणून बाहेरील व्यापाºयांना येथे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारला मेड इंडियात नव्हे तर मेक इन इंडियात अधिक रस आहे. मेक इंडियातंर्गत देशाबाहेरील उद्योजकांना येथे येऊन व्यापार करता येतो. पण मेड इंडियात हे शक्य नाही. त्यामुळे सरकारला मेक इंडियात अधिक रस असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजप सरकार देखील भ्रष्टाचारी असून त्यांचे एक एक प्रकरण पुढे येत आहे. जे धोरण काँग्रेसचे होते तेच भाजपाचे आहे. मागील तीन वर्षात भाजप सरकारने केवळ माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी प्रस्तावित केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यापलिकडे काहीच केले नाही. सामान्य माणसाच्या खिशातील पैसे काढण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. तसेच राष्टÑीय स्वंयसेवक संघ आणि भाजप सरकारकडून कायद्याची पायमल्ली केली जात आहे. या सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.तूरडाळ आयातीत मोठा घोटाळगेल्यावर्षी देशात तुरीचे विक्रम उत्पादन होणार असा अंदाज कृषी मंत्रालयाने वर्तविला होता. त्यानंतरही केंद्र सरकारने विदेशातून मोठ्या प्रमाणावर तूरडाळ आयात केली. परिणामी स्थानिक व्यापाºयांना त्याचा फटका बसला व तुरीचे दर पडले. तूरडाळीची आयात केवळ पाच बड्या व्यापाºयांना फायदा पोहोचविण्यासाठी करण्यात आली. यात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.