शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीमिंग पूल’ मध्ये पोहले ६ हजार लोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:35 IST

पोहताना अनेक व्यायाम होतात. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना पोहण्यासाठी नदी, नाले नाहीत. ज्या नदी आहेत ते कोरडे पडले आहेत. गोंदियावासीयांना पोहण्याचा आनंद घेता यावा यातूनही उत्तम खेळाडू घडावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव दीड वर्षापासून उभारण्यात आले. लोकांसाठी खुले असलेल्या या जलतरण तलावावर गोंदिया शहर व जिल्ह्यातील ६ हजार लोकांनी याचा लाभ घेतला आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण गोंदियात : दीड वर्षांपासून जलतरण तलाव खुले

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोहताना अनेक व्यायाम होतात. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना पोहण्यासाठी नदी, नाले नाहीत. ज्या नदी आहेत ते कोरडे पडले आहेत. गोंदियावासीयांना पोहण्याचा आनंद घेता यावा यातूनही उत्तम खेळाडू घडावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव दीड वर्षापासून उभारण्यात आले. लोकांसाठी खुले असलेल्या या जलतरण तलावावर गोंदिया शहर व जिल्ह्यातील ६ हजार लोकांनी याचा लाभ घेतला आहे.जिल्हा क्रीडा संकुल समिती गोंदियातर्फे जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या जलतरण तलाव मोठ्या प्रमाणात आकर्षकरित्या तयार करण्यात आले. या जलतरण तलावावर येणाऱ्या खेळाडूंना व नागरिकांना सर्वच प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तेथे बाथरूम, शौचालय, चेंजींग रूम तयार करण्यात आले आहेत. महिलांसाठी वेगळ्या रूम तर पुरूषांसाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. जलतरण तलावात उतरण्यापूर्वी शॉवरवर जाण्यासाठी वेगळी खोली आहे. नागरिकांना पोहण्याचा आनंद लुटता यावा, यासाठी २५ मीटर रूंद व ५० मीटर लांब टँक तयार करण्यात आले आहे. ८ फूटापासून १२ फूटापर्यंत पाणी खोल आहे. ८ फूटापासून पोहण्याची सुरूवात करणारा व्यक्ती पोहण्यात तरबेज झाल्यास १२ फुटापर्यंत जात असतो. ६ मे २०१७ रोजी लोकार्पण करून जनतेसाठी खुले करण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या जलतरण तलावावर पाय ठेवायला जागा नसतो. मागील दीड वर्षापासून ६ हजार लोकांनी जलतरण तलावावर हजेरी लावून पोहण्याचा आनंद लुटला. तलावाच्या चारही बाजूला पाच-पाच मीटर जागा इतर लोकांना बसण्यासाठी उपलब्ध आहे. तलावावर गर्दी वाढल्यास प्रत्येक फेरीतील लोकांना १ तासाचा वेळ दिला जातो. त्यातील ४५ मिनिटे पोहण्यासाठी व १५ मिनिटे पोहायला जाण्यापूर्वीची तयारी व पोहून आल्यानंतर तयारी करण्यासाठी दिली जाते.पाण्यातील घाण दूरण्यासाठी बसविल्या मशीन२५ मीटर रूंद व ५० मीटर लांब असा तयार करण्यात आलेल्या जलतरण तलावात आंघोळीसाठी लोक उतरल्यास घाण होणे साहजीक आहे. ती पाण्यातील घाण वेगळी करण्यासाठी मोठ्या मशीन त्या जलतरण तलावाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या खोलीत ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी शुध्द केले जाते.गोंदियातील लोकांना या जलतरण तलावाचा लाभ घेता यावे,यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव उभारण्यात आले आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आता उन्हाचे दिवस सुरू होत असताना गर्दी वाढू लागली आहे.-राजेंद्र शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गोंदिया.