शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील ६ टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

तिरोड्यात नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून रेती भरलेले एकूण ६ टिप्पर खैरलांजी-तिरोडा मार्गाने येत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी नाष्टे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार प्रशांत घोरूडे तथा महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाने कारवाई करून हे टिप्पर जप्त करून तहसील कार्यालय परिसरात जमा केले.

ठळक मुद्देपरराज्यातून रेतीची आवक : १६.६२ लाखांचा ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा :  शून्य रॉयल्टी उपलब्ध नसतानासुद्धा परराज्यातून महाराष्ट्रात अनेक वाहने गौण खनिज घेऊन येत आहेत. अशाच रेती भरून परराज्यातून आलेल्या ६ टिप्परला पकडून त्यांच्यावर १६ लाख ६२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १६) मध्यरात्री करण्यात आली आहे. तिरोड्यात नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून रेती भरलेले एकूण ६ टिप्पर खैरलांजी-तिरोडा मार्गाने येत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी नाष्टे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार प्रशांत घोरूडे तथा महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाने कारवाई करून हे टिप्पर जप्त करून तहसील कार्यालय परिसरात जमा केले. यामध्ये सौरभ ठामेंद्रसिंह चव्हाण (रा. तिरोडा)  यांचा टिप्पर क्रमांक एमएच ३६- एए २३५८, एमएच ३६- एए १२५१, सुनील बचवानी (रा. तिरोडा) यांचा टिप्पर क्रमांक एमएच ४०- बीजी ०५४०, गणेश देशमुख (रा. हिंगणा, नागपूर) यांचा टिप्पर क्रमांक एमएच ४०-बीएल ४३६२, हरीश अशोक बांदे (रा. नागपूर) यांचा टिप्पर क्रमांक एमएच ४०-बीजी ४४५२ व उमेश शहारे (रा. दाभा, भंडारा) यांचा टिप्पर क्रमांक एमएच ३६-एफ ३५७३ चा समावेश आहे. सर्व टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. प्रत्येकी ५ ब्रास रेती व एका वाहनावर दंड असा दोन लाख ७७ हजार रुपये दंड याप्रमाणे जप्त करण्यात आलेल्या रेती व ६ टिप्परवर एकूण १६ लाख ६२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. परराज्यातून आलेला वाळूचा साठा व निर्गतीबाबत कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने परराज्यातून जे गौण खनिज येतात, त्यामधील रॉयल्टीची १० टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानला जमा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर रॉयल्टी प्राप्त करून त्यावर वाहतूक करणे अपेक्षित आहे. मात्र बरीच वाहने परराज्यातून महाराष्ट्रात येत असताना  रॉयल्टी त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे ती वाहने जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आली आहेत. वसुलीची कारवाई त्यांना नोटीस बजावून करण्यात येत आहे. 

टॅग्स :sandवाळू