शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

५८७ शाळांमध्ये ‘वाचन कुटी’

By admin | Updated: March 11, 2017 00:14 IST

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनात आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत ‘वाचन कुटी’ तयार करण्याची कल्पना

राज्यात गोंदिया आघाडीवर : विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाच्या गोडीसाठी यशस्वी प्रयोग नरोश रहिले   गोंदिया विद्यार्थ्यांना अवांतर वाचनात आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत ‘वाचन कुटी’ तयार करण्याची कल्पना करून ती प्रत्यक्षात साकार करण्यात गोंदिया जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १०४८ पैकी ५८७ शाळांमध्ये वाचन कुटी तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे वाचन कुटी तयार करण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली. विशेष म्हणजे लोकसहभागातून ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या वाचन कुटी तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी शासनातर्फे विकसित शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी वाचन कुटी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर इतर पुस्तकांचे वाचन करण्यासाठी या कुटीमध्ये खास पुस्तके ठेवली जात आहेत. विद्यार्थ्यानी मोकळ्या वातावरणात ज्ञानार्जन करावे, भयमुक्त वातावरणात वाचन करून अभ्याक्रमाच्या ज्ञानाबरोबर सामान्य ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने ही संकल्पना पुढे आणली. या ‘वाचन कुटी’ ला लोकसहभाग मिळत आहे. गवतापासून तयार केलेल्या झोपडीला वाचन कुटी नाव देण्यात आले. ‘वाचन कुटी’त विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र, विविध मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, जिल्ह्यातील भौगोलिक माहितीव्यतिरिक्त विविध पुस्तके ठेवल्या जात आहेत. झळकते अभिव्यक्ती स्वातंत्र्य शासनाच्या आदेशावर ३१ डिसेंबर २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १०४८ शाळांत दप्तरविहीत शाळा (वाचन आनंद) कार्यक्रम पहिल्यांदा घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद मिळाला होता. शिक्षण विभागाला ‘वाचन कुटी’ची संकल्पना मिळाली. यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य झळकत आहे. या वाचन कुटीचा सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे शिक्षणाधिकारी नरड यांनी सांगितले.