शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५६० प्रवाशांना परत केली बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 21:47 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी : एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मधील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे. प्रवाशांना फोनद्वारे सूचना देवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीवर बोलविण्यात आले. कायदेशीररित्या सामान व बॅगची ओळख पटवून ५६० बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.रेल्वेमध्ये सर्वाधिक माल वाहतूक होते. शिवाय एक कोटी २० लाखांच्या जवळपास प्रवासी दररोज प्रवास करतात. तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या तिन्ही मंडळाद्वारे प्रवासी सुविधांवरही लक्ष दिले जात आहे. दपूम रेल्वेच्या तिन्ही मंडळांतर्गत ३१६ स्थानकांवर दिवसरात्र प्रवासी सुविधा प्रदान करीत ३५५ प्रवासी गाड्यांचे परिचालन दरदिवशी केले जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येत लोक सुरक्षितपणे आपल्या गंतव्यापर्यंत रेल्वेद्वारे पोहोचविले जात आहेत. एखाद्या विषम परिस्थितीत प्रवाशांची टिष्ट्वट व एसएमएस तसेच हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार मिळते. त्यावर त्वरित कार्यवाही करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झोन अंतर्गत येणाºया स्थानकांत प्रवाशांद्वारे घाईगडबडीत बॅग सुटून जातात. त्यात रोख रकमेसह लॅपटॉप, किंमती दागिने, महागड्या वस्तू व प्रवाशांचे किंमती सामान असतात. याची सूचना संबंधित प्रवाशांकडून रेल्वेच्या सुरक्षा विभागाला दिली जाते. त्यानंतर प्रवाशांच्या सामानाचा शोध घेतला जातो. बॅग किंवा सामान मिळताच त्वरित या मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाद्वारे कार्यवाही केली जाते. त्यात सामानांच्या मालकांचा शोध घेवून त्यांचा पत्ता लावला जातो. सामानांची ओळख पटवून त्यांचे सामान व साहित्य त्यांच्या ताब्यात दिले जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाबद्दल विश्वास वाढला आहे.याच दृष्टीने दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे. प्रवाशांना फोनद्वारे सूचना देवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीवर बोलावून बॅगची ओळख पटवून त्यांना देण्यात आल्या.वर्षभरात ३१० बालकांना केले पालकांच्या स्वाधीनकाही कारणांमुळे दपूम रेल्वे स्थानकांमध्ये आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेले किंवा कौटुंबीक कारणांमुळे कुटुंबाला माहिती न करताच घरून निघून गेलेली अल्पवयीन मुले रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात आढळली. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षभरात अशा ३१० अल्पयीन बालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.तक्रार मिळताच केली जाते त्वरित कार्यवाहीया सर्व सामाजिक कार्यांना योग्यरित्या करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलने सीसीटीव्ही कॅमेºयांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला २४ तास नजर ठेवण्यास मदत होत आहे. त्याद्वारे संशयीतांची तपासणी केली जात आहे. आरपीएफ टिष्ट्वटर हँडल अकाऊंटसुद्धा प्रवाशांच्या सुविधांसाठी देण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आहे. त्यावर प्रवाशांची तक्रार मिळताच रेल्वे सुरक्षा दलद्वारे त्वरित कार्यवाही केली जात असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले आहे.