शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

५३४४ जणांना गुरूजींचे वेध

By admin | Updated: January 17, 2016 01:35 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेत डीएडच्या ३ हजार ५७७ तर बीएडच्या १ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जिल्ह्यातील २४ केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात आली आहे.ही परीक्षा सुरक्षित पार पडावी, यासाठी सात पथके तयार करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रावर या पथकाची निगरानी होती. मात्र परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घण्यात आली. यापूर्वी १५ डिसेंबर २०१३ ला पहिली परीक्षा व १४ डिसेंबर २०१४ ला दुसरी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०१५ या वर्षासाठी आज (दि.१६) तिसरी परीक्षा घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरातील २४ केंद्राची निवड करण्यात आली होती. यामध्ये डी.टी.एड. पात्रताधारक ३ हजार ८३० विद्यार्थ्यांसाठी १५ केंद्र तर बी.एड. पात्रताधारक १ हजार ८९० विद्यार्थ्यांसाठी ९ केंद्राची निवड करण्यात आली होती. परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन पाळीत घेण्यात आली आहे. यामध्ये रविंद्रनाथ टागोर बंगाली हायस्कूल येथे उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी दोन केंद्र होते त्यात डी.एड.चे ४० तर बी.एड.चे ५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विवेक मंदिर शाळेत एका केंद्रावरून ६०० विद्यार्थी, बी.एन.आदर्श सिंधी हायस्कूल येथून ८०० विद्यार्थी, मनोहर म्यु. हॉयर सेकंडरी शाळेतून ६५० विद्यार्थी, मनोहरभाई कनिष्ठ महाविद्यालयातून ४०० विद्यार्थी, राजस्थानी कन्या हायस्कूल येथून ५००, महावीर मारवाडी शाळेत ७००, गुजराती नॅशनल हायस्कूल ४०६, एस.एस.गर्ल्स हायस्कूल येथून २००, सरस्वती महिला विद्यालय पुनाटोली २७५, जे.एम.हायस्कूल पुनाटोली २५०, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल २००, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयात ३०० व गोंदिया पब्लीक शाळा या केंद्रावर ३४० विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. एकूण २४ केंद्राच्या माध्यमातून ५ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. परंतु डीएडचे ३ हजार ५७७ व बीएडचे १ हजार ७६७ असे एकूण ५ हजार ३४४ जणांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेला डीएडचे २५३ तर बीएडचे १२३ परीक्षार्थी गैरहजर होते. प्रत्येक केंद्रावर परीक्ष सुरळीत पार पाडण्यासाठी ६ झोनल अधिकारी, २ सहायक परीक्षक तर प्रत्येक केंद्रावर १ केंद्र संचालक होते. २५ विद्यार्थ्यांमागे १ समवेक्षक तर १२५ विद्यार्थ्यांमध्ये १ पर्यवेक्षकाची निवड करण्यात आली होती. मागील ३ वर्षापासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. मात्र यापूर्वीच्या घेण्यात आलेल्या दोन्ही परीक्षेपेक्षा परीक्षार्थ्यांची संख्या रोडावली आहे. या परीक्षेमुळे डीटीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांमधील गुणांची चाचपणी केली जाणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी दिली आहे.(तालुका प्रतिनिधी)परीक्षेसाठी सात भरारी पथकमहाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील २४ केंद्रावरून घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीने सात भरारी पथके तयार करण्यात आली होती. यात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी,माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण व डॉयट प्राचार्य यांचे प्रत्येकी एक असे सात भरारी पथक तयार करण्यात आले होते.