शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

५३१ दुर्गा मूर्र्तींची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:20 IST

जगत जननी देवी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना गुरूवारी जिल्हाभरात उत्साह आणि आनंदपूर्ण वातावरणात करण्यात आली.

ठळक मुद्दे५४७ शारदा मूर्र्तींची स्थापना : १९४ ठिकाणी होणार रावणदहन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जगत जननी देवी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना गुरूवारी जिल्हाभरात उत्साह आणि आनंदपूर्ण वातावरणात करण्यात आली. मागील वर्षी जिल्ह्यात ५३८ ठिकाणी दुर्गा मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. यावर्षी ५३१ मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. भाविकांनी दुपारपासूनच मूर्तिकारांजवळून मूर्ती ढोलताशांच्या गजरात नेऊन स्थापना केली.गोंदिया जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावाने दुर्गोत्सव साजरा केला जातो. नवरात्रीदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सार्वजनिक दुर्गा उत्सवात गरबा, दांडीया, नृत्य, जागरण व विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज गुरूवारी ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मूर्ती स्थापन करण्यात आल्या. त्या गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत ४० दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २१ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत २१ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २१ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ५५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ५० ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ५५ दुर्गा स्थापन करण्यात आली. ३० ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे.तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत ३९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २९ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ३५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. १८ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ३० दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ७० दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ३५ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ४९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४१ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ६९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४९ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे.देवरी पोलिस ठाण्यांतर्गत ९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ५५ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत ५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ३५ ठिकाणी शारदा मूर्तीची स्थापन केली जाणार आहे. डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत १५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ६४ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत २५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४५ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत ५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २४ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत ७ दुर्गा मूर्तीची स्थापन करण्यात आल्या.१९४ ठिकाणी रावणदहननवरात्रौत्सवाच्या अखेर रावनदहन केले जाते. गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षी १९० ठिकाणी रावणदहन करण्यात आले होते. तर यंदा १९४ ठिकाणी रावणदहन केले जाणार आहे. त्यात गोंदिया शहर ५, रामनगर २, गोंदिया ग्रामीण ४२, रावणवाडी ७, तिरोडा २, गंगाझरी १०, दवनीवाडा ५, आमगाव १९, गोरेगाव ७, सालेकसा ३, देवरी २, चिचगड ४, डुग्गीपार ५५, अर्जुनी-मोरगाव ३, नवेगावबांध २, केशोरी २६ रावण दहन केले जाणार आहे.२७५ होमगार्ड मागविलेदुर्गोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस बंदोबस्त करणार आहेत. ३ दंगल नियंत्रक पथक नियंत्रण कक्षात ठेवण्यात येणार आहेत. गरज भासल्यास त्या ठिकाणी या पथकांना पाठविता येणार आहे. या ३ पथकांत ३ अधिकारी व ३७ कर्मचाºयांचा समावेश आहे. ४ उपविभागीय अधिकाºयांकडे प्रत्येकी १ ट्रॅकींग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी १ ट्रॅकींग फोर्स असे ६ फोर्स तयार करण्यात आले आहेत. त्यात ६ अधिकारी व ५० कर्मचाºयांचा समावेश आहे. ३ पथक पोलीस मुख्यालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यात दोन सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोध, नाशक पथकही नेमण्यात आले आहेत.या गोष्टीची घ्यावी लागणार काळजीमूूर्तीच्या सुरक्षिततेसाठी उत्सव मंडळ व ग्राम सुरक्षा दल नेहमी प्रमाणे पुढाकार घेणार आहे. मूर्ती मांडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडणार नाही, मूर्तीच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जबाबदारी मंडळाच्या सदस्यांची राहील. जनावरे मंडपात येणार नाही याची काळजी घ्यावी. अश्या सूचना पोलिस विभागाकडून करण्यात आल्या आहे.