शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या ५१ इच्छुकांनी केले पक्षनिरीक्षकांसमोर शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: August 9, 2014 00:53 IST

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ५१ लोकांनी शुक्रवारी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या.

गोंदिया : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ५१ लोकांनी शुक्रवारी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या. यावेळी जिल्हाभरातील आपल्या समर्थकांसह त्यांनी हजेरी लावून शक्तिप्रदर्शनही करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पक्षाचे संघटनात्मक काम आणि विविध क्षेत्रात वाढलेल्या भाजपच्या प्रतिनिधींची संख्या पाहता गोंदिया विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडून भाजपकडे घेण्याची शिफारस वरिष्ठांकडे केली जात असल्याची माहिती निरीक्षकांनी पत्रकारांना दिली.भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.राम शिंदे आणि किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मते हे निरीक्षक म्हणून शुक्रवारी गोंदियाच्या दौऱ्यावर होते. येथील अग्रसेन भवनात त्यांनी सकाळी ११ पासून चारही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज भरून घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव हे दोन विधानसभा मतदार संघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. भाजप-सेना युतीत गोंदिया वगळता उर्वरित तीनही मतदार संघातून भाजपचे उमेदवार निवडणूक लढतात. तर गोंदिया विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढतो. मात्र यावेळी गोंदिया विधानसभा मतदार संघ भाजपकडे घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे यावेळी दिसून आले. गोंदिया विधानसभा मतदार संघासाठी १४, तिरोडा विधानसभा क्षेत्रात १५, अर्जुनी मोरगाव विधानसभेसाठी १२ तर आमगाव विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी १० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. (जिल्हा प्रतिनिधी)