गोंदिया : राज्य शासनाच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार, येथील जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील ५०२ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यांतर्गत बदली ३० एप्रिल रोजी करण्यात आली. या बदलीमध्ये नक्षलग्रस्ता भागातील पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्या कर्मचाऱ्यांना त्याच परिसरातील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. अनेक त्या ठिकाणी जाणाऱ्या अनेक इच्छुक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आपल्याला पुन्हा नक्षलग्रस्त भाग मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारावरुन या बदली प्रक्रियेबद्दल अनेक पोलीस कर्मचारी नक्षलग्रस्त भागातील मिळाणाऱ्या भत्यापासून वंचित राहणार आहेत.राज्य शासनाच्या १६ फेब्रुवारीच्या गृह विभागाच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ३० एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध ठाण्यातील ५०२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गोंदिया शहर १४, ग्रामीण १९, रावणवाडी १९, रामनगर २८, तिरोडा १२, दवनीवाडा ६, गंगाझरी ४, आमगाव १२, गोरेगाव ३ सालेकसा १५, देवरी ११, चिचगड ६, नवेगावबांध १०, केशोरी १३, डुग्गीपार १२, अर्जुनी-मोरगाव १०, गणुटोला एओपी ११,भरनोली ९, बोंडे ८, गोठणगाव ५ मगरटोह ८, दर्रेकसा २, धाबे-पवनी १, बिजेपार ८, पिपरिया १७, सी-६० मिरी पथक ५, गौतम पथक २, घरत पथक ६, बारसे पथक ६, माहुर्ले पथक ४, वाढई पथक ८, औरासे पथक ७, नेताम पथक ३, भलकांबे पथक ४, हिचामी पथक ३, अत्तरगडे पथक ५, कार्यालय पथक १, रक्षा पथक ४, पोलीस मुमुख्यालय गोंदिया १४८, उुउपमुख्यालय देवरी ८, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया ७, वाहतूक शाखा गोंदिया ३ नियंत्रित कक्ष गोंदिया ४, नक्षल सेल गोंदिया ३, जिल्हा विशेष शाखा २, महिला सेल गोंदिया २, वाचक शाखा ४ अशाप्रकारे ५.२ कर्मचाऱ्यांच्या विविध ठाण्यात बदल्या करण्यात आल्या.विशेष म्हणजे, नवीन एओपी, सी-६०, पीएस सालेकसा, चिचगड, देवरी, देवरी उपमुख्यालय, डुग्गीपार, केशोरी, नवेगावबांध हा भाग नक्षलग्रस्त म्हणून घोषित आहे. या भागात कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिडपट भत्ता अधिकचा मिळतो. भत्ता अधिकचा मिळत असल्याने या क्षेत्रात अनेक पोलीस कर्मचारी जाण्यास इच्छुक असतात. मात्र, या बदल्यामध्ये नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच भागात बदली मिळाल्याने अनेक इच्छुक पोलीस कर्मचारी मिळाणाऱ्या भत्त्यापासून वंचित राहणार आहेत. या भागात कार्य करुन दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना जवळचेच पोलीस ठाणे मिळाल्याने यामध्येही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बदलीत पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने याचा परिणाम त्यांच्या कार्यप्रणालीवर पडू शकतो. (तालुका प्रतिनिधी)
५०२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या
By admin | Updated: May 6, 2015 01:07 IST