शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार विद्यार्थिनींना मिळणार सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:01 IST

शासनाच्या मानव विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना शंभर टक्के अनुदानावर सायकल वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमानव विकास कार्यक्रम : एक कोटी ६० लाखाची तरतूद

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासनाच्या मानव विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना शंभर टक्के अनुदानावर सायकल वाटप करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयार केली असून लवकरच सायकलचे वाटप केले जाणार आहे.ज्या विद्यार्थिनीच्या घरांपासून शाळेचे अंतर ३ कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्या विद्यार्थिनीना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के अनुदानावर सायकल देण्याची योजना सुरु केली आहे. गावापासून शाळेचे अंतर दूर आहे म्हणून मुली शिक्षण सोडू नये, यासाठी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना मिळणार आहे. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांच्या शैक्षणिक मार्गातील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इयत्ता ८ ते १२ वीच्या गरजू विद्यार्थिनीना सायकल वाटप करण्याकरिता मानव विकास कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी एक कोटी ५९ लाख ८४ हजार रुपयांचा निधी माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांना देण्यात आला आहे. गोंदिया, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव, सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या आठही तालुक्यातील प्रत्येकी ६६६ विद्यार्थिनींना सायकलचा लाभ देण्यात येणार आहे.त्यासाठी प्रत्येक तालुक्याला १९ लाख ९८ हजार रुपये असे एक कोटी ५९ लाख ८४ हजार रुपये शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले आहे. ही रक्कम तालुका निहाय वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांनी दिली.मानव विकाससाठी १३ कोटी ९० लाखमानव विकास कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी १३ कोटी ६२ लाख ५६ हजार रुपये मंजूर केले आहे. यामध्ये २७ लाख १२ हजार अनुसूचित जातीच्या उपाय योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहे. एकूण १३ कोटी ८९ लाख ६८ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.