शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:19 IST

वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की आणणाऱ्या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कुटुंबासह नातेवाईकांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की आणणाऱ्या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.भंडारा-गोंदिया लोकसभेची पोट निवडणूक २८ मे रोजी होत आहे. या निवडणुकीवर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. एका कर्मचाऱ्यामागे ८ नातेवाईक व घरच्या लोकांसोबत असे ४० हजार लोक या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत.कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमीत करण्यासाठी अनेकवेळा धरणे आंदोलन, मोर्चे काढून स्थानिक आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही यावर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. केवळ आश्वासनावरच कंत्राटी कर्मचाऱ्यांना भागवावे लागले. यामुळे सरकारच्या उदासिन धोरणाला कंटाळून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.यानंतरही शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारात न घेतल्यास २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, उपाध्यक्ष अतूल गजभिये, सचिव विकास कापसे, कोषाध्यक्ष प्रकाश रहमतकर, स्वप्नील अग्रवाल, भागचंद रहांगडाले, कुलदीपीका बोरकर, दिशा मेश्राम, ग्रीष्मा वाहने, राजू येडे, मनोज तिवारी, मनोज बोपचे, जितेंद्र येरपुडे, उमेश भरणे, गजानन धावडे, राजन चौबे, श्रीकांत त्रिपाठी, डी.जी. ठाकरे व इतरांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन सुध्दा निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांना दिले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक