शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४९ टक्के मतदारांनी बजावला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 21:44 IST

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने मतदानाची संधी दिली. त्यामुळे बुधवारी (दि.३०) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजता या दरम्यान मतदान घेण्यात आले.

ठळक मुद्दे४९ केंद्रावर मतदान : १९ हजार नागरिकांनी केले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने मतदानाची संधी दिली. त्यामुळे बुधवारी (दि.३०) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजता या दरम्यान मतदान घेण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील दोन व अर्जुनी-मोरगाव, तिरोडा व गोंदिया या विधानसभा क्षेत्रातील ४९ केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्याने मतदान २८ मे रोजी होऊ शकले नाही. परिणामी निवडणूक विभागाने या केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३९ हजार ५८९ मतदारांपैकी १९ हजार ३३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले. मात्र मतदान दरम्यान जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये बिघाड आला होता. त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला. यातील बहुतांश केंद्रांवरील मशिनची दुरूस्ती करून यंत्रणेने मतदान करवून घेतले होते.मात्र जिल्ह्यातील ३१ केंद्रांवरील तर भंडारा जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रावरील मशिनची दुरूस्ती होऊ न शकल्यामुळे या केंद्रांवरील मतदान थांबविण्यात आले होते. त्या ठिकाणी बुधवारी मतदान घेण्यात आले. सकाळी ११ वाजतापर्यंत २२.८४४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजतापर्यंत ४१.१४ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजता ४५.८६ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ४८.८५ टक्के मतदान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील २ मतदान केंद्रावरील १४९६ मतदारांपैकी ९४३ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६३.०३ आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ मतदान केंद्रावर ६ हजार ३६३ मतदारांपैकी ३५३१ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ५५.४९ आहे. तर गोंदिया विधानसभा क्षेत्रातील २१ मतदान केंद्रावरील १९ हजार १८३ मतदारांपैकी ७७५० मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ४०.४० आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील ४९ मतदान केंद्रावरील ३९ हजार ५८९ मतदारांपैकी १९ हजार ३३८ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ४८.८५ एवढी आहे.