शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव तालुक्यात ४७ वाचनकुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 04:14 IST

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने शालेय

दिलीप चव्हाण ल्ल गोरेगावजिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने शालेय परिसरात वाचनकुटी तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने गोरेगाव तालुक्यात ४७ वाचनकुटी तयार करण्यात आल्या आहेत.वाचनकुटीचा विद्यार्थी अवांतर वाचन व अभ्यास करण्यासाठी मोठ्या उत्साहाने वापर करतात. मुलांसाठी वाचन कुटीत वाचनालयातील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात. उन्हाळी शिबिर अंतर्गत उपक्रमासाठीदेखील वाचन कुटीचा उपयोग होत आहे. वाचन कुट्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याच्या ठरत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. विशेष म्हणजे वाचनकुटीत बसल्यावर निसर्गाच्या सानिध्यात बसल्याचा आभास होतो. पूर्वीच्या काळी ज्या वाचन कुट्या पहायला मिळायच्या, हुबेहुब तशाच वाचनकुट्या शिक्षक-विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमातून तयार केल्या आहेत.गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव केंद्रात हिरडामाली, घोटी, चंद्रपूरटोली, कटंगी, चोपा केंद्रात चोपा, तुमसर, बाम्हणी, आकोटोला, हिराटोला, तेढा, गोवारीटोला, कुऱ्हाडी केंद्रात भुताईटोला, मेंगाटोला, बागळबंद, आसलपाणी, खाडीपार, साईटोला, मोहगाव तिल्ली केंद्रात मोहगाव, तेलनखेडी, तानुटोला, गौरीटोला, पलखेडा, महाजनटोला, तिल्ली, बबई केंद्रात बबई, चिल्हाटी, आंबेतलाव, मोहाडी, मुंडीपार केंद्रात कमरगाव, मुरदोली, हेटी, जांभुळपाणी, भंडगा, पालेवाडा, कवलेवाडा केंद्रात बघोली, मरारटोला, दवडीपार केंद्रात दवडीपार, ज्योतिबानगर, बोटे, बोरीटोला, मोहगाव, सर्वाटोला, झांजीया, धुंदाटोला, नोनीटोला, गणखैरा केंद्रात गणखैरा, सिलेगाव या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांत सुशोभित विविधतेने नटलेल्या वाचनकुट्या तयार करण्यात आल्या आहेत. शाळेतील शैक्षणिक वातावरणाला गती देण्यासाठी सदर उपक्रम राबविला जात आहे. यातच विद्यार्थीही शालेय वेळेपेक्षा आधी येवून या वाचनकुट्यांत बसून शिक्षणाचे धडे गिरवित असल्याचे चित्र आहे.