शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लावणार ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देशी रोपट्यांना प्राथमिकता देत कोणती रोपटी किती टक्क्याप्रमाणे लावावी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र ...

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्ष लागवडीत सहभाग: देशी वृक्षांवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देशी रोपट्यांना प्राथमिकता देत कोणती रोपटी किती टक्क्याप्रमाणे लावावी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र शासनाने जुलै २०१७ मध्ये २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा माणस बांधला होता. सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे. या संकल्पात गोंदिया जिल्ह्याचा वाटा ४५ लाख २९ हजार ५०० रोपट्यांचा राहणार आहे. यात प्रादेशिक वनविभाग १० लाख ७० हजार रोपटे लावेल. सामाजिक वनिकरण ५ लाख रोपटे, वनविकास महामंडळ (एफडीसीएम) ३ लाख, इतर विभागाकडून २० लाख ६० हजार ७२६, जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती ५ लाख ९९ हजार ५०० रोपटे लावणार आहेत. असे एकूण ४५ लाख २९ हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले. काही ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.देशी रोपट्यांना प्राधान्ययंदाच्या वृक्षारोपणात एकाच प्रजातीचे रोपटे एक टक्यापेक्षा जास्त लावणार नाहीत. परंतु देशी रोपट्यांना मोठ्या प्रमाणात लावले जाणार आहे. २५ टक्के वड, पिंपळ, उंबर ही रोपटे लावण्यात येणार आहेत. ७५ टक्के आवळा, करू, चारूळी, फळ झाडे व बांबू रोपटे लावली जातील. गोंदिया जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती गावातील रस्ता व स्माशन भूमीकडे जाणाºया रस्त्यावर वृक्षारोपण करतील. या रस्त्यासाठी १३५६.५४ हेक्टर क्षेत्र प्रपत्र ४ प्रमाणे वृक्षारोपणासाठी खुले आहे.मागच्या वर्षीची २७ टक्के रोपटी मेलीगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्राम पंचायतींनी वृक्षारोपणाच्या कामात चांगले सहकार्य केले. या कामात सर्वात जास्त हलगर्जी आमगाव तालुक्याची झाली आहे. आमगाव तालुक्यात लावलेली ३५ टक्के रोपटी मेली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ टक्के, देवरी तालुक्यातील १६ टक्के, गोंदिया तालुक्यातील ११ टक्के, गोरेगाव तालुक्यातील २८ टक्के, सालेकसा तालुक्यातील २९ टक्के, सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ टक्के, तिरोडा तालुक्यातील २५ टक्के रोपटी मेली. जिल्ह्याची टक्केवारी पाहिली असता २७ टक्के रोपटी जगू शकली नाहीत.