शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१२ पोलीस ठाण्यांतर्गत ४५ बालकांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:35 IST

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देचार पोलीस ठाणे शांत : मिळालेल्या बालकांना करणार पालकांच्या स्वाधीन

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत न मिळालेल्या ४५ बालकांचा शोध पोलीस घेणार आहेत. यात ६ मुले व ३९ मुली अशा एकूण ४५ बालकांच्या शोधासाठी ६ वे आॅपरेशन मुस्कान गोंदिया जिल्हा पोलीस राबवित आहेत.मुलांकडून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते.१८ वर्षाखालील बेपत्ता व अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शोधून त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबवित आहे. या आॅपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाºया मुलांशी संपर्क केला जातो. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी राबविलेल्या पाच आॅपरेशनची फलश्रृती पाहता महाराष्टÑ शासनाने पुन्हा डिसेंबर महिनाभर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.गोंदिया पोलीस दलाच्या अभिलेखावरील ४५ बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची चमू तयार झाली आहे.बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या ४५ बालकांत गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतील १२ बालके, गोंदिया ग्रामीण ३, रावणवाडी ३, दवनीवाडा १, आमगाव ३, सालेकसा १, देवरी ४, अर्जुनी-मोरगाव ४, केशोरी १, तिरोडा ३, गोरेगाव ९, रामनगर १ अश्या ४५ बालकांपैकी ३९ मुली व ६ मुलांचा समावेश आहे.सामाजिक संघटना उदासीनया बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई-वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलीस करतात. समितीने त्या बालकांना बाल सुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु गोंदियातील कोणत्याही सामाजिक संघटना यापूर्वी पुढे आलेल्या नाहीत.त्यांचे जीवन फुलायला हवेबेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान प्रकल्पात पकडलेल्या अनेक बालकांचे जीवन आजही ‘जैसे थे’ आहे. आईवडील नसलेल्या बालकांना नागपूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात येते व त्यांची स्थिती या अभियानानंतरही जशीच्या तशीच राहते.आॅपरेशन मुस्कानमध्ये काम करणारे पोलीस कर्मचारी स्वत:च्या अपहरण झालेल्या पाल्यांचा शोध घेण्यासाठी जेवढी मेहनत घेतील तेवढीच मेहनत सामान्य, गरीबांच्या मुला-मुलींना शोधण्यासाठी घेतील अशी अपेक्षा आहे.हरिष बैजलपोलीस अधीक्षक गोंदिया.