शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया नगर परिषदेला ४५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:29 IST

शहराचा सर्वांगिण विकास व नागरी सुविधांच्या पूर्ततेकरिता आराखडा तयार करून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ नोव्हेंबर रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराचा सर्वांगिण विकास व नागरी सुविधांच्या पूर्ततेकरिता आराखडा तयार करून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ नोव्हेंबर रोजी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शहरातील विविध विकास कामांसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याला होकार दर्शवित गोंदिया नगर परिषदेला ४५ कोटी रुपयांचा निधी त्वरीत मंजूर करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.गोंदिया शहर व लगतच्या परिसरात कोणतेही मोठे प्रकल्प किंवा उद्योग नाहीत. येथे उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगपती पुढे येत नाही. त्याचा परिणाम नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. नगर परिषदचे स्वत:चे उत्पन्न अतिशय कमी असल्यामुळे नगर परिषद स्व:निधीतून कोणतेही शहर विकासाचे काम करू शकत नाही. शहर विकास व नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाचा निधी आवश्यक आहे.त्यामुळे नगराध्यक्ष इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. दरम्यान विविध विकासकामांचा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यात शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरु स्ती व देखभाल तसेच नवीन रस्ते बांधकामाकरिता २५ कोटी रुपयांची मागणी विशेष रस्ता अनुदान या योजनेतून केली. शहरात अस्तीत्वात असलेल्या उद्यांनांचे नुतनीकरण करणे,शहरातील मंजूर ले आऊटमधील मोकळ्या जागांमध्ये चिल्ड्रेन पार्क, जीम, वृक्षारोपण, सौंदर्यीकरण अशा अनेक योजना विशेष अनुदान वैशिष्टयपूर्ण अनुदानातून १० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला.शहरातील दलितवस्ती प्रभागांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी आणि वाचनालय, अभ्यासिका आदी प्रकल्प राबविण्याकरिता २०१७-१८ या आथिक वर्षात १० कोटी रु पये उपलब्ध करून देण्याची मागणी इंगळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्ताव गांभिर्याने समजून घेत संबंधित विभागांच्या प्रमुखांशी बोलून त्वरीत निधी मंजूर करण्याची सूचना केली. गोंदिया नगर परिषदेला विकासाकरिता निधी कमी पडू देणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे उपस्थित होते.