शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

४४ गावातील सातबारा होणार बिनचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:45 IST

सातबाऱ्यातील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर छोट्याशा त्रुटीमुळे त्यांना शासकीय कार्यालय आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.

ठळक मुद्देविनाशुल्क दुरूस्ती : आ.अग्रवाल यांचा पाठपुरावा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सातबाऱ्यातील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर छोट्याशा त्रुटीमुळे त्यांना शासकीय कार्यालय आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. हीे अडचण लक्षात घेत महसूल आणि भूमि अभिलेख विभागातर्फे जमिनीची पुर्नमोजणी करुन बिनचूक सातबारा तयार करुन दिला जाणार आहे. यासाठी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.चकबंदीनंतर गोंदिया तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये त्रुटी आढळल्या. परिणामी शेतकऱ्यांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत होते. तर अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. सातबारातील त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी भूमि अभिलेख आणि महसूल विभागाकडे अर्ज आणि शुल्क भरुन देखील रेकार्ड दुरूस्ती करुन देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. शेतकºयांची ही अडचण लक्षात घेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या सातबाराची नि:शुल्क दुरूस्ती आणि पुर्नमोजणी करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर महसूल विभागाने किती गावांमधील शेतकºयांच्या सातबारामध्ये त्रुटी आहेत, याचे सर्वेक्षण केले असता गोंदिया तालुक्यातील ४४ गावांमधील सातबारामध्ये सर्वाधिक त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटी संबंधित विभागाने जमिनीची पुर्नमोजणी करुन दुरूस्त करुन द्याव्यात. यासाठी आ. अग्रवाल यांनी महसूल विभागाचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, भूमि अभिलेख विभागाचे विभागीय उपसंचालक बाळासाहेब काळे, जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर महसूल विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सातबारामधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले. उपसंचालक काळे यांनी गोंदिया तालुका भूमि अभिलेख निरीक्षक पवार यांना दोन महिन्यात पुर्नमोजणीचे काम पूर्ण करुन सर्व शेतकºयांच्या सातबारामधील त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांना सुधारित सातबारा वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून दुरूस्तीसाठी करावी लागणारी पायपीट सुद्धा कमी होणार आहे.चूक शासनाची, भुर्दंड शेतकऱ्यांना कासातबारामधील त्रुटीस महसूल आणि भूमिअभिलेख विभागाची यंत्रणा जबाबदार आहे. त्यात दुरूस्ती करून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलेही शुल्क वसूल करण्यात येऊ नये. त्रुटींना पूर्णपणे प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे, मग त्याचा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना का? असा सवाल उपस्थितीत करित आ.अग्रवाल यांनी याला विरोध केला. तसेच एकाही शेतकºयाकडून शुल्क वसूल न करण्याची मागणी केली होती. त्याची शासनाने दखल घेत जमिनीची पुर्नमोजणी नि:शुल्क करुन देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.या गावातील सातबारात सर्वाधिक त्रुटीगोंदिया तालुक्यातील सातबारामध्ये सर्वाधिक त्रुटी असलेल्या गावांमध्ये एकोडी, गंगाझरी, महालगाव, मुरदाडा, अदासी, दतोरा, दागोटोला, नवरगाव खुर्द, पोवरीटोला, मोरवाही, आसोली, बटाना, मुरपार, पिपरटोला, नवेगाव (धा.) या गावांचा समावेश आहे.