शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:10 IST

प्लास्टिकबंदी विरोधात मोहिम कडक करीत नगर परिषदेने शहरातील एका कारखान्यावर धाड टाकून तेथून ४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. संबंधित व्यावसायिकावर ही दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आल्यामुळे या वेळी त्याला १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

ठळक मुद्देकारखान्यावर धाड : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही पथकात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्लास्टिकबंदी विरोधात मोहिम कडक करीत नगर परिषदेने शहरातील एका कारखान्यावर धाड टाकून तेथून ४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. संबंधित व्यावसायिकावर ही दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आल्यामुळे या वेळी त्याला १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे, गुरूवारी (दि.४) दुपारी २ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुद्धा पथकात होते.मागील काही दिवसांपासून प्लास्टीक बंदी विरोधी कारवाया बंद असल्याने शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढू लागला होता. याची दखल घेत नगर परिषदेने सोमवारपासून (दि.२) पुन्हा प्लास्टिक बंदी विरोधी मोहिम सुरू केली. यांतर्गत पथकाने शहरातील सहा व्यापाऱ्यांवर कारवाई करीत ३० हजार रूपयांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या व थर्माकोल साहित्य जप्त केले होते.बुधवारीही पथकाने कारवाई केली होती. एवढ्यावरच न थांबता पथकाने गुरूवारी (दि.४) दुपारी २ वाजता जवळील ग्राम कारंजा येथील प्रकाश प्रोव्हीजन्स या कारखान्यावर धाड टाकली.या धाडीत पथकाने कारखान्यात ४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तर या व्यापाऱ्यावर ही दुसऱ्यांदा कारवाई असल्याने पथकाने त्याला १० हजार रूपयांचा दंड ठोठावला.नगर परिषदेने केलेल्या गुरूवारच्या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी महेश भिवापूरकर व अर्जुन राठोड हे सुद्धा सहभागी झाले होते.तर त्यांच्या सोबत नगर परिषद कर्मचारी नगर परिषद अभियंता उमेश शेंडे, सुमेध खापर्डे, आरोग्य निरीक्षक मुकेश शेंदे्र, मनिष बैरिसाल, देवेंद्र वाघाये, सुमित शेंद्रे, लिपीक प्रवीण गढे, शिव हुकरे, रोहिदास भिवगडे पथकात होते. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी ५० किलो प्लास्टिक जप्तनगर परिषदेच्या पथकाने बुधवारी (दि.३) शहरात कारवाई करून चार व्यापाºयांना दणका दिला होता. पथकाने शहरातील जैन कुशल भवन समोरील मनिष ट्रेडर्स, बापूजी व्यायाम शाळा जवळील श्रीराम किराणा स्टोअर्स, सिंधी कॉलनी शंकर चौकातील गुरूकृपा नॉवेल्टी व चांदनी चौकातील डॉन धिरज प्लास्टिक या दुकानांवर कारवाई केली होती. पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एकूण २० हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच, त्यांच्याकडील डिस्पोजल ग्लास, थर्माकोल प्लेट्स, पाणी पाऊच, प्लास्टिक पिशव्या असे एकूण ५० किलो साहित्य जप्त केले होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी