शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ४० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागातर्फे सर्वेक्षण नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. शासनाने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या आपादग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी ४० लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला.तालुक्यात २०१६ मध्ये पावसाळी ...

ठळक मुद्देशेकडो घरांची झाली होती पडझड : आपादग्रस्तांना निधीचे वाटप सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागातर्फे सर्वेक्षण नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. शासनाने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या आपादग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी ४० लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला.तालुक्यात २०१६ मध्ये पावसाळी अतिवृष्टीमुळे पिकांसह घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे १६५७ घरांची पडझड झाली होती. याचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल शासनाला पाठविला होता. मात्र नुकसान भरपाईचा निधी देण्यास शासनाकडून विलंब होत होता. आपादग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आ. संजय पुराम यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने आमगाव तालुक्यातील आपादग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी ४० लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करुन आमगाव तहसील कार्यालयाकडे पाठविला. नुकसान भरपाईची रक्कम आपदग्रस्तांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर या मदत निधीचे वाटप केले जाणार आहे.आ. पुराम यांच्या पाठपुराव्यामुळे आपदग्रस्तांना लवकर निधी मिळण्यास मदत झाल्याने आपादग्रस्तांना समाधान व्यक्त केले.