शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ३९७ शेततळ्यांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 01:30 IST

सन २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यापासून शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना

१० पूर्णत्वाकडे : ४६० चे लक्ष्य, शेतकऱ्यांना ४.३० लाखांचे अनुदानदेवानंद शहारे ल्ल गोंदिया सन २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यापासून शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली. या योजनेचे जिल्हाभरात ४६० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. वर्षभराच्या कालावधीत ३६३ शेततळ्यांना मंजुरी देऊन आखणी करून देण्यात आली. याशिवाय कार्यारंभाचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ १० शेततळे पूर्णत्वास गेले आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ ५० टक्केपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांना दिला जातो. यात ३० बाय ३ मीटर कमाल क्षेत्रफळाची मर्यादा आहे. जिल्ह्याला दिलेल्या ४६० शेततळ्यांच्या उद्दिष्टासाठी एकूण ७६९ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ७६३ शेतकऱ्यांनी सेवाशुल्कही भरले. त्यात पात्र गावांतील ५६५ तर अपात्र गावांतील ६२ अर्ज होते. यापैकी शासकीय निकषानुसार ४९६ शेतकरी पात्र व ९२ शेतकरी अपात्र ठरले. तसेच ४६० शेतकऱ्यांची जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य तर ८४ शेतकऱ्यांची जागा अयोग्य ठरली. याशिवाय १२ शेतकऱ्यांची अजून जागा तपासणी झालेली नाही. या प्रक्रियेत तालुकास्तरीय समितीने उद्दिष्टाला अनुसरून एकूण ३९७ अर्जांना मंजुरी दिली. २२ अर्ज समितीसमोर ठेवणे बाकी आहेत. त्यापैकी ३६३ शेततळ्यांची आखणी करून कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. सध्या १२ कामे सुरू असून १० पूर्ण झालेली आहेत. त्यातही नऊ शेततळ्यांना आतापर्यंत अनुदान देण्यात आले आहे. नऊ शेततळ्यांना मिळाले अनुदान ४जिल्ह्यात आतापर्यंत १० शेततळे तयार करण्यात आले. यात सालेकसा तालुक्यात उद्दिष्टापेक्षा दोन अधिकच्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली. गोंदिया तालुक्यात उद्दिष्टापैकी दोन शेततळे तयार होणार नाहीत. नऊ शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील दोन शेततळ्यांच्या कामासाठी एक लाख रूपये, तिरोडा तालुक्यात पाच कामांसाठी २.३० लाख रूपये, देवरी तालुक्यात एका कामासाठी ५० हजार रूपये, आमगाव तालुक्यात एका कामासाठी ५० हजार रूपये अशा एकूण ९ शेततळ्यांसाठी ४.३० लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. सालेकसा तालुक्यात पूर्णत्वास गेलेल्या एका कामासाठी अनुदान उपलब्ध होणे बाकी आहे. ंजिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामाची स्थिती तालुका उद्दिष्ट मंजुरी काम पूर्ण गोंदिया ५६ ५४ २ तिरोडा ९४ ९४ ५ गोरेगाव ६५ ४१ ० अर्जुनी-मोर ० ० ० देवरी १८९ १७५ १ आमगाव १४ १४ १ सालेकसा ३६ ११ १ सडक-अर्जुनी ६ ८ ० एकूण ४६० ३७९ १०