शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

३९ मुली अजूनही बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:56 IST

पौगंडावस्थेत मुला-मुलींची बदलणारी मानसिकता, त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह, आर्थिक परिस्थीती कमकुवत, भविष्याची सुरक्षीतता पाहून आईवडीलांना त्यागून मुली परक्या मुलांसोबत पळून जातात. ही संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. प्रौगंडावस्थेतील ३९ मुली अजूनही बेपत्ता असल्याची नोंद जिल्हा पोलिसांकडे आहे.

ठळक मुद्देलग्नाच्या आमिषाला बळी : पळालेल्या बहुतांश मुली परतल्या

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पौगंडावस्थेत मुला-मुलींची बदलणारी मानसिकता, त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह, आर्थिक परिस्थीती कमकुवत, भविष्याची सुरक्षीतता पाहून आईवडीलांना त्यागून मुली परक्या मुलांसोबत पळून जातात. ही संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. प्रौगंडावस्थेतील ३९ मुली अजूनही बेपत्ता असल्याची नोंद जिल्हा पोलिसांकडे आहे.शाळा शिकताना आकर्षणाच्या नादी लागून प्रेम पाशात अडकलेल्या मुली आईवडीलांची तमा न बाळगता प्रियकरासोबत शहरात पळून जातात. आईवडील त्यांचा शोध नातेवाईक व मैत्रीणींकडे करून आपल्या माथ्यावर हात मारत नशीबालाच दोष देत बसतात. परंतु ज्या मुलांसोबत त्या मुली पळून जातात त्याच मुली महिने-दोन महिन्यांतच गेल्या पावली परतात. परंतु एकदा गेलेली मुलगी परतलीच नाही तर तिची विक्री तर झाली नाही अशी भितीही पालकांच्या मनात येते.जन्म देणाऱ्या मात्यापित्यांच्या आशेवर पाणी फेरणारे मुले-मुली लग्न करण्याच्या इराद्याने शहरात पलायन करतात. आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नसलेली मुले ज्या मुलीला पळवून नेतात तिला काही दिवसांतच सोडून देतात. एकदा पळून गेलेली मुलगी आईवडीलांकडे परतल्यावर तिच्यासाठी योग्य वर शोधनेही आई वडिलांना क ठीण जाते. काही तर चक्क त्या मुलींची विक्री करतात. गोंदिया जिल्हा पोलीस विभाग आॅपरेशन मुस्कान- ५ राबवित असून या आॅपरेशनमध्ये अद्याप परतून आलेल्या ३९ मुलींचा शोध घेण्यात येणार आहे.यात तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १, सालेकसा १, अर्जुनी-मोरगाव ४, रामनगर १, ग्रामीण ३, गोंदिया शहर १२, गोरेगाव ८, देवरी ४, आमगाव १, रावणवाडी २, केशोरी व दवनीवाडा प्रत्येकी एक अशा ३९ मुलींचा समावेश आहे. १ ते ३१ डिसेंबर २०१८ या महिनाभरात या मुलींचा व बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. मिळालेल्या मुला-मुलींना आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.मुलींची परप्रांतात विक्रीराजस्थान, पंजाब व हरियाणा या प्रांतात मुलींची संख्या कमी असल्याने या प्रांतातील लोक मुलींच्या शोधात महाराष्ट्रात येतात. त्यातच गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या टोकावर असल्याने येथील आदिवासी व त्यांच्य गरीबीचा फायदा घेऊन मुलींना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. गोंदिया जिल्हा पोलिसांनी तीन-चार वर्षापूर्वी अशा प्रकारचे गुन्हेही दाखल केले होते. परप्रांतातील लोकांना जिल्ह्यातील मुली सोपविणारे दलालही सक्रीय आहेत. जागरूक नागरिकांच्या सहकार्याने पुढील अनर्थ टळू शकतो. बेपत्ता झालेल्या ज्या मुली आहेत त्यांची विक्री तर करण्यात आली नाही अशी शंका येते.या ठिकाणी राबविणार शोधमोहीमबेपत्ता मुला-मुलींचा शोध मुलांचे आश्रमगृह, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी काम करणाºया मुलांंना भेटून त्यांना अपहरण करून तर आणले नाही. किंवा ते स्वत:हून पळून आले याचा शोध आॅपरेशन मुस्कानचे पोलीस घेणार आहेत.वयात येतांना मानसिक व शारीरिक होणारे बदल, त्यातच त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह व नाजूक आर्थिक परिस्थिती यामुळे स्वत:ला कमजोर समजणारी मुलगी भविष्याची सुरक्षीतता पाहत असते. याच वेळी या मुलींना हेरले तर ती समोरच्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकते. हे होऊ नये यासाठी पालकांनी घरातील वातावरण प्रफुल्लीत ठेवावे. वाट चुकणाºया मुला-मुलींना वेळीच वळणावर आणले तर पळून जाण्याचे प्रमाण निश्चीतच कमी होईल.-डॉ.प्रदीप गुजरबालरोग विशेषतज्ज्ञ गोंदिया.