शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशांचे ३.९ कोटी खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:33 IST

प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली.

ठळक मुद्दे७७ हजार विद्यार्थी : शिक्षण विभागाची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली. यंदापासून गणवेशाची रक्कम विद्यार्थी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यात देण्याचा निर्णय झाला. यांतर्गत जिल्ह्यातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाने दिले. जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाने मुख्याध्यापकांच्या खात्या ही रक्कम टाकली. परंतु शंभर टक्के विद्यार्थ्यांनी गणवेश घेतले किंवा नाही ही बाब गुलदस्त्यात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व श्रीमंत-गरीब असा भेदभाव नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची योजना शासनाने सुरू केली. शाळेत सर्व विद्यार्थी गणवेशात यावे यासाठी शासनाने वर्षातून दोन गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा पायंडा रचला. वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश देण्याचे नियम तयार केले.विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश देण्यासाठी गणवेशाची रक्कम शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली. यापूर्वी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळून गणवेश खरेदी करीत होते. यात एक जोड गणवेशासाठी २०० रूपये असे दोन जोडसाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्याच्या मागे शाळेला मिळत होते. परंतु गणवेशातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या झळकत असल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आली.सन २०१७-१८ या सत्रातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश देण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाने दिले. यंदा शासनाकडून गणवेशाची व्यवस्था पालकांनीच करावी असे ठरविले. गणवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आई किंवा पालकांसह असलेल्या संयुक्त खात्यात गणवेशाचे ४०० रूपये टाकले गेले. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ च्या ४२ हजार ५८५ मुली, अनुसूचित जातीची ४ हजार ७७९ मुले, अनुसूचित जमातीची ६ हजार ६६५ मुले व दारिद्रय रेषेखालील २३ हजार ३५३ मुले अशा एकूण ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी द्यायचे होते. पैसे तर जिल्हा परिषदेकडून देण्यात आले. परंतु सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केले किंवा नाही ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.