गोंदिया : अवैध विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू असतानाच ऐन होळीच्या दिवशीही पोलिसांनी या अवैध दारू विक्रेत्यांना दणका दिला. पोलिसांनी रविवारी (दि.२८) सकाळी १२ ठिकाणी धाड घालून तीन लाख ८८ हजार ६५० रुपयांचा सडवा, दारू व अन्य साहित्य जप्त केले आहे.
यांतर्गत, पोलिसांनी संजय सोविंदा बरेकर (रा. रामाटोला, सिल्ली) याच्या घरातून एक लाख चार हजार रूपये किमतीचा १३०० किलो सडवा मोहाफूल, छाया सोविंदा बरेकर (रा. रामाटोला, सिल्ली) हिच्या घरातून एक लाख १२ हजार रुपये किमतीचा १४०० किलो सडवा व सहा हजार ४०० रुपये किमतीचा १६० किलो गूळ असा एकूण एक लाख १८ हजार ४०० रुपयांचा माल, काचेखानी जंगल परिसरात नामे विजय लेहनदास वंजारी (रा. मारेगाव) याच्या ताब्यातून १६ हजार रुपये किमतीचा २०० किलो सडवा व चार हजार ९०० रुपये किमतीची २० लिटर मोहादारू असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा माल, कृष्णा बंडूलाल बाभरे (रा. सालेभाटा) याच्या घरातून ४४ हजार रुपये किमतीचा ४४० किलो सडवा, जितेंद्र बन्सीधर मेश्राम (रा. येडामकोट) याच्या घरातून दोन हजार रुपये किमतीची २० लिटर मोहादारू, अर्चना रमेश कावळे (रा. करटी बुज) हिच्या घरातून ५०० रुपये किमतीची ५ लिटर मोहा दारू जप्त केली.
तसेच, मांगो विश्वानाथ भेलावे (रा. घोगरा) याच्या घरातून एक हजार ५०० रूपये किंतीची १५ लीटर मोहादारू,
धीरज प्रकाश बरेकर (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून मोहादारू गाळण्याची भट्टी मिळून आली असता तेथून भट्टीचे भट्टी साहित्य, १५० लिटर मोहादारू, सडवा मोहाफुल असा एकूण ८० हजार ८५० रूपयांचा माल, नीता विजय सोनवणे (रा. बिरशी) हिच्या घरातून दोन हजार रूपये किंमतीची २० लिटर मोहादारू, विजय भाऊराव डोंगरे (रा. बेरडीपार) याच्या घरातून तीन हजार ५०० रूपये किंमतीची ३५ लीटर मोहादारू, नीशा दिनेश जगणे (रा. बेरडीपार) याच्या घरातून एक हजार ५०० रूपये किंतीची १५ लीटर मोहादारू, देबीलाल फत्तु नागपुरे (रा. बेरडीपार) याच्या घरातून एक हजार ५०० रूपये किंतीची १५ लीटर मोहादारू अशाप्रकारे १२ धाडीतून एकूण तीन लाख ८८ हजार ६५० रूपयांचा माल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योेगेश पारधी, पोउपनि केंद्रे, महिला पोउपनि राधा लाटे, पोहवा साठवणे, दामले, चेटुले, नापोशी बांते, बारवाय, श्रीरामे, बर्वे,थेर,वाडे, कुळमेथे, शिपाई बिसेन, उके, सवालाखे, दमाहे, अंबादे, महिला नापोशी भूमेश्वरी तीरीले, महिला पोशी माधुरी शेंडे यांनी केली आहे.