शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी बनविण्याच्या नावावर ३८.५० लाखाने लुटले; महिलेवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Updated: February 2, 2024 21:48 IST

आठ जणांची केली फसवणूक

गोंदिया: आय आर सी टी सी रेल्वे कॅटरींगच्या टेंडरमध्ये भागीदारी देण्याच्या नावावर सात जणांकडून ३८ लाख ५० हजार रूपये लुटणाऱ्या महिलेवर रामनगर पोलिसात २ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता राजकुपूर शेंडे रा. साई मंदिर गोविंदपूर गोंदिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. तीने आठ जणांना सारखेच आमिष देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली आहे.

गोंदिया शहराच्या पाल चौकातील मम्मी हाऊस नावाचे रेस्टॉरंट चालविणारी संगीता राजकुपुर शेंडे हिने आठ जणांना आय आर सी टी सी रेल्वे कॅटरींगच्या टेंडर घेतला आहे. त्यातून चांगला नफा कमवित आहे. यासाठी पैसे गुंतवावे लागतात. आपण पैश्याची मदत केली तर आपल्याला चांगला नफा होईल असे सांगून आठ जणांकडून ३८ लाख ५० हजार रूपये टप्या-टप्याने घेतले. १२ एप्रिल २०२३ रोजी गोंदिया येथील तिच्या मम्मी हाऊस रेस्टारेंटमध्ये फिर्यादी राखी चंदन भारद्वाज (४५) रा. गजानन कॉलोनी साई सरनम अपार्टमेंटच्या जवळ गोंदिया यांनी दिले होते.

सन २०२२ मध्ये एका कार्यक्रमात राखी भारद्वाज यांची संगिता राजकपूर शेंडे रा. साई मंदिर गोविंदपूर गोंदिया हिच्यासोबत ओळख झाली. त्यावेळी तिने ती भाडयाने मम्मी हाऊस नावाचे रेस्टॉरेंट पालचौक, गोंदिया येथे चालवित होती. त्यानंतर त्यांची वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात भेट होत होती. एकदा संगिता शेंडे हिने सामाजिक कार्यक्रमादरम्यान एक रेल्वे कॅटरिंगचे टेंडर घेतले आहे, त्याकरिता एक चांगली पार्टनर हवी आहे. त्या भागिदारीमधून चांगला आर्थिक फायदा होतो असे तिने विश्वासपूर्वक सांगितले. त्यावरून संगीतासोबत त्यांनी भागीदारी करण्यास सहमती दर्शविली. १२ एप्रिल रोजी संगीताला तिचा पती राजकपूर शेंडे याच्यासमोर ४ हजार रूपये दिले. त्याचा लाभ म्हणून तिनी २ हजार रूपये फायदा झाल्याचे सांगून परत केले. त्यानंतर ६० हजार मागीतले. पुन्हा ८ मे २०२३ ला कॅटरींसाठी आणखी पैश्याची गरज असल्याचे सांगितल्याने त्यांनी ओळखीचे धनंजय ठाकूर यांच्या फोन पे वरून संगिता शेडे हिच्या फोन पे वर ४० हजार टाकले. परंतु भारद्वाज यांचा फायदा न झाल्याने त्यांनी पैशाबाबत विचारणा केली असता तीने टाळाटाळ केली. मग फोन उचलने बंद केले. त्यानंतर धमकी देत तुला जे करायचे आहे ते कर असे म्हणाली. नाईलाजाने त्यांनी रामनगर पोलिसात तक्रार केली. रामनगर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी भादंविच्या कलम ४२०, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.यांची केली फसवणूक

राखी भारद्वाज यांची एक लाखाने, निरजा किशोरकुणाल अग्रवाल रा. मामा चौक, सिव्हील लाईन, गोंदिया यांच्याकडून २ लाख ५० हजार, अर्चना संतोष शर्मा रा. सिव्हील लाईन गोंदिया यांच्याकडून ८ लाख, जयशीला किशोर उके रा. गजानन कॉलोनी, गोंदिया यांच्या कडून ८ लाख, जया सौरभ शर्मा रा. क्रिष्णपुरावाॅर्ड, गोंदिया यांच्याकडून ६ लाख रुपये, रेखा सुरज वर्मा रा. किष्णपुरावाॅर्ड, गोंदिया यांच्याकडून २ लाख रूपये, मोहन दिवाकरराव अंबुलकर रा. हनुमान नगर, गोंदिया यांच्याकडून ३ लाख रूपये, उमेश धनलाल बावणकर रा. मोहगाव ता. गोरेगाव याच्याकडून ४ लाख रुपये असा एकूण ३८ लाख ५० हजाराने फसवणूक करण्यात आली.