शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

३८३ प्रकल्पग्रस्तांसाठी ३८.४३ कोटींचे पॅकेज

By admin | Updated: July 10, 2017 00:41 IST

तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून ...

बोर्डाच्या बैठकीत विषय लागला मार्गी : उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून यासाठी ३८.४३ कोटींच्या पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा विषय निकाली लागला. बिरसी विमानतळ विस्तारीकरणासाठी प्राधीकरणने ग्राम परसवाडा, झिलमीली, कामठा व बिरसी या गावातील अनेकांची शेती व घरांचे अधिग्रहण केले होते. या प्रकल्पग्रस्तांनी योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन देऊनही तत्कालीन कॉंग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात काहीच मदत केली नाही. दरम्यान सन २०१४ मध्ये केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाच्या विषयाशी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून खासदार नाना पटोले यांना अवगत करविले. प्रकल्पग्रस्तांचा हा गंभीर विषय असल्याने खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला घेऊन दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या पुढे मांडला होता. यावर नामदार सिन्हा यांनी भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे के. सुधाकर यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. तर याच विषयाला घेऊन नामदार सिन्हा यांच्यासोबत २९ मार्च रोजी खासदार पटोले, बिरसी विमानतळ अधिकारी रेड्डी व येथील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीतच नामदार सिन्हा यांच्याकडून पॅकेज मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या बैठकीच्या आधारावर ६ जून रोजी बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला व ३८.४३ कोटींच्या या पुनर्वसन पॅकेजच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. याबाबत भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे निर्देशक संदीप पिंपळापुरे यांनी तसे पत्र काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.