शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३८ डॉक्टरांना अद्याप रूजू केले नाही

By admin | Updated: July 27, 2014 23:48 IST

मॅग्मो संघटनेच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातील ३८ डॉक्टरांना कार्यमुक्त केले होते. त्या डॉक्टरांना संप मिटल्यावरही परत कामावर घेण्यात आले नाही.

संपाला पाठिंबा दिल्याची शिक्षा : शालेय आरोग्य तपासणी बंद गोंदिया : मॅग्मो संघटनेच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातील ३८ डॉक्टरांना कार्यमुक्त केले होते. त्या डॉक्टरांना संप मिटल्यावरही परत कामावर घेण्यात आले नाही. पंधरवड्यापासून कार्यमुक्त झालेले ते ३८ डॉक्टर मानसिक तणावात आहेत.राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत जुलै २००८ मध्ये ८८० डॉक्टरांची ११ महिन्यांसाठी करार तत्वावर नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०१३ मध्ये आणखी एक हजार २७० डॉक्टरांची नेमणूक केली. राज्यात २ हजार १७० कंत्राटी डॉक्टर शालेय आरोग्य तपासणीसाठी नियुक्त आहेत. शाळा, आंगणवाडी येथील बालकांची तपासणी केल्यानंतरही ते रूग्णालयात सेवा देतात. या तपासणीसाठी या डॉक्टरांना अनेकदा वाहनं उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते स्वत:च्या खर्चातून गाड्या भाड्याने घेऊन तपासणीसाठी जातात. यासाठी त्यांच्या मानधनात आठ टक्क्याने वाढ झाली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. तरीही हे डॉक्टर नियमितपणे काम करतात. राज्यात १ जुलैपासून राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनाने (मॅग्मो) बेमुदत संप सुरू केला. त्याला या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील डॉक्टरांनी पाठिंबा दिला. आठ टक्के मानधनात वाढ द्यावी या मागणीला त्यांनी धरून सामुदायिक रजा आंदोलन केले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढण्यात आले. या कारवाईत राज्यातील ५४४ डॉक्टरांचा समावेश असून गोंदिया जिल्ह्यातील ३८ जणांचा समावेश आहे. आपल्या मागणीसाठी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देणे ही बाब त्यांच्या रोजगारावर बेतली आहे. ज्या मॅग्मो संघटनेला पाठिंबा दिला त्या संघटनेने आपलाच विचार करून या डॉक्टरांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर टाकला. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १० डॉक्टर, आमगाव ग्रामीण रूग्णालयात चार, उपजिल्हा रूग्णालय तिरोडा येथे चार, गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात चार, सडक/ अर्जुनी ग्रामीण रूग्णालयात चार, अर्जुनी/मोरगाव ग्रामीण रूग्णालयात चार, सालेकसा ग्रामीण रूग्णालयात दोन, देवरी ग्रामीण रूग्णालयात चार व आश्रम पथकात दोन डॉक्टर आहेत. या ३८ डॉक्टरांना कार्यमुक्त केल्यामुळे बालकांची तपासणी थांबलेली आहे. ज्या संपाला या डॉक्टरांनी पाठिंबा दिला त्या मॅग्मोने यांना रूजू करण्यापूर्वी आपला सनप मागे घेतला कसा? यात मॅग्मोचे वरिष्ठ अधिकारी मॅनेज तर झाले नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)