शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख लिटर केरोसीनची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:34 IST

शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी संगणीकृत प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस सिलिंडर आहे. त्या ग्राहकांना केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देघोषणापत्राची झाली मदत : जिल्ह्यात २ लाख गॅस सिलिंडरधारक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी संगणीकृत प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस सिलिंडर आहे. त्या ग्राहकांना केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.यासाठी शिधापत्रिका धारकांकडून गॅस सिलिंडर असल्याचे घोषणापत्र भरुन घेतले जाते. परिणामी महिन्याकाठी साडेतीन लाख लीटर केरासीन आणि त्यावर दिल्या जाणाऱ्या अनुदानाची बचत करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले आहे. पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानातून पीओएस मशिनव्दारेधान्याचे वितरण केले जात आहे. तर केरोसीनचे वितरण करण्यासाठी सुध्दा याच प्रणालीचा अवलंब केला जात आहे.जिल्ह्यात एकूण १८ वितरक, ११२९ रिटेलर्स व १०६ हाकर्स आहेत. यांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे वितरण केले जाते. अनुदानीत रॉकेलचा प्रती लीटर दर २८ रुपये ३० पैसे आहे. तर विनाअनुदानीत केरोसीनचा प्रती लीटर दर ५६ रुपये आहे. मात्र पीओएस प्रणालीपूर्वी केरोसीनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता. तर शासनाने ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस सिलिंडर आहे त्यांना केरोसीन न देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या निणर्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबविली. ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस सिलिंडर आहे त्यांच्याकडून ते असल्याचे घोषणापत्र भरुन घेण्यात येत आहे. आत्तापर्यंत ९४ हजार शिधापत्रिकाधारकांनी गॅस सिलिंडर असल्याचे घोषणापत्र भरून दिले.जिल्हा पुरवठा विभागाने राबविलेल्या मोहीमेमुळे दरमहा साडेतीन लाख लीटर केरोसीन व त्यावरील लाखो रुपयांचे अनुदानाची बचत करण्यास मदत झाली. हे सर्व जिल्हा पुरवठा विभागातंर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांच्या परिश्रमामुळे शक्य झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी सांगितले.पीओएस मशीनव्दारे वितरण करणाऱ्यांना अधिक कमिशनपार्इंट आॅफ सेल (पीओएस) मशिनव्दारे स्वस्त धान्याचे वितरण करणाºया स्वस्त धान्य दुकानदारांना प्रोत्साहान देण्यासाठी शासनाने त्यांच्या कमिशनमध्ये वाढ केली आहे. पीओएस मशिनव्दारे स्वस्त धान्याचे वितरण करणाऱ्या दुकानदारांना प्रती क्विंटल १२० रुपये व पीओएस शिवाय वितरण करणाऱ्या प्रती क्विंटल ८० रुपये कमिशन दिले जात असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.२ लाख शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्नराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील २ लाख २१ हजार प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य मिळावे. यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना स्वस्त धान्याची उचल करता येणार आहे.