शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

३४६५ विद्यार्थिनी सायकलपासून वंचित

By admin | Updated: July 27, 2016 02:06 IST

अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली.

मानव विकास खुंटला : विभागाच्या अधिकाऱ्यांकडे माहितीचा अभाव नरेश रहिले गोंदिया अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील चार वर्षापासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दीष्टाप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिंनींना या योजनेचा लाभ द्यायचा आहे. म्हणजेच जिल्ह्यात दरवर्षी ५ हजार ३२८ विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करायचे आहे. परंतु मागील दोन वर्षात ३ हजार ४६५ विद्यार्थिनी या सायकलींपासून वंचित असल्याने मानव विकास योजना राबविण्यात नियोजन अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. शाळेत जाण्यासाठी ८ ते १२ वी च्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात ३ हजार रूपये टाकण्याची योजना शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत अंमलात आणली. ० ते ५ किमी अंतरावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्याार्थ्यांना दरवर्षी सायकलींचा लाभ देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आठ तालुके असल्याने ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देण्यात येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात हजारो मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी आस लावून बसल्या आहेत. परंतु मानव विकास कार्यक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे मागील दोन वर्षात या योन्जनेपासून ३ हजार ४६५ विद्यार्थीनी वंचीत राहील्या आहेत. सन २०१३-१४ पासून या योजनेला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे ५ हजार ३२८ मुलीांना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतुप सन २०१४-१५ या वर्षात फक्त ३ हजार १८९ मुलींना लाभ देण्यात आला . उर्वरीत २ हजार १३९ विद्यार्थीनींना लाभ देण्याचे शासनाचे नियम असतांनाही त्यांना नियोजन अधिकारी मानव विकास यांनी वंचीत ठेवले. सन २०१५-१६ या वर्षात ४ हजार २ मुलींना लाध देण्यात आला. परंतु त्याही वर्षात १ हजार ३२६ मुलींना या लाभापासून वंचीत ठेवण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षाचे सायकलींचे नियोजनच अद्याप करण्यात आले नाही. असा दिला जातो लाभ सायकलचा लाभ देण्यासाठी मुलींना तीन हजार रूपये त्यांच्या खात्यात पाठविले जातात. जिल्हा नियोजन अधिकारी हा निधी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देतात. शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवतात व ते विद्यार्थीनींच्या खात्यात सुरूवातीला २ हजार रूपये व मुलीने सायकल घेतल्यानंतर बील सादर केल्यास उर्वरीत एक हजार रूपये त्यांना दिले जाते. पैशाचा हिशेबच नाही या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नियोजन विभागाने माध्यमिक शिक्षण विभागाला किती पैसे दिले याचा हिशेबच मानव विकासच्या नियोजन अधिकारी मृ.अ. भूत यांच्याकडे नाही. त्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. परंतु किती पैसे दिले याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे आढळली. तुम्ही दिलेल्या पैश्याचा उपयोग त्या विद्यार्थीनींना मिळाला किंवा नाही याचे उपयोगिता प्रमाणपत्राची माहिती देणे दूरच आहे. १४१५० लाभार्थी प्रतिक्षेत मानव विकास योजनेंतर्गत सायकल करीत ३ हजार रूपये देण्याची योजना शासनाची असल्याने या योजनेसाठी सन २०१६-१७ या सत्राकरीता गोंदिया जिल्ह्यातील १४ हजार १५० विद्याथीनी प्रतिक्षेत आहेत. मागील दोन वर्षात ३४६५ मुलींना वंचीत ठेवण्यात आले. त्याची भरपाई म्हणून यंदाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थीनींना देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्याव वाढवून देण्यात यावी ही मागणी होत आहे. या १४ हजार १५० मुलींसाठी ४ कोटी २४ लाख ५० हजार रूपये लागणार आहेत. नियोजन अधिकारी म्हणतात मानव विकास कार्यक्रम सांभाळण्यासाठी नियोजन अधिकारी म्हणून मृ.अ. भूत यांची नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे किती विद्यार्थीनींना आतापर्यंत लाभ दिला याची माहिती नाही. ही योजना राबविणारी यंत्रणा जिल्हा परिषदेचा माध्यमिक विभाग आहे. त्यांच्याकडेच माहिती मिळेत, आमच्याकडून माहिती दिली जाणार नाही. आमच्या संगणकावरील फाईल आताच करप्ट झाल्या आहेत. आमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.