शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

344 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 21:29 IST

निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीलासुद्धा सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे गावातील राजकीय वातावरणसुद्धा तापायला सुरुवात झाली होती; पण ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव यांनी गुरुवारी पत्र काढत ऑक्टोबर-ते डिसेंबर २०२२ या कालावधी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे पत्र काढले. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील सत्तासंघर्षावरुन वादंग सुरू असतानाच राज्य सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाने गुरुवारी (दि.२९) काढले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ३४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर जाणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला पुन्हा खीळ बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ३४४ ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल१७ ऑक्टोबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीलासुद्धा सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे गावातील राजकीय वातावरणसुद्धा तापायला सुरुवात झाली होती; पण ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव यांनी गुरुवारी पत्र काढत ऑक्टोबर-ते डिसेंबर २०२२ या कालावधी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे पत्र काढले. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या निवडणुका चार ते पाच महिने लांबल्यास ग्रामपंचायतर्गत सुरू असलेल्या अनेक विकासकामांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे तर ग्रामीण भागाचा विकास रखडण्याची शक्यता आहे. 

३४४ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज जिल्ह्यातील ३४४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ १७ ऑक्टोबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र, जिल्ह्यात आधीच कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत त्यातच आता ग्रामपंचायतच्या प्रशासकपदाचा पदभार शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविला जाण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचा निधी राहणार पडून ग्रामविकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ग्रामपंचायतींना १५ व्या आयोगातंर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, निवडणुका लांबणीवर जाऊन प्रशासकराज आल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी तसाच पडून राहण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूरमुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता शासनाने त्यावर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश काढल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक