शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यात ३२ शाळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:45 IST

भारत स्काऊटस आणि गाईड्स जिल्हा संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्तवतीने ग्राम पुराडा येथील शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळेत स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देभारत स्काऊट-गाईड : पुराडा आश्रमशाळेत जिल्हा मेळावा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत स्काऊटस आणि गाईड्स जिल्हा संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्तवतीने ग्राम पुराडा येथील शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळेत स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील ३२ शाळांनी सहभाग दर्शविला. त्यामध्ये ६९० स्काऊट-गाईड व स्काऊट-गाईडर यांनी सहभाग घेतला.उद्घाटन माजी महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम व नलू राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड मेळाव्यात वेळापत्रकाप्रमाणे दिवसाची सुरुवात सकाळी रॅलीने करण्यात आली. मेळाव्यात चित्रकला, निबंध, आनंद मेळावा, बिनभांड्यांचा स्वयंपाक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे तंबू निरीक्षण, प्रदर्शनी, देशभक्तीपर समूहगीत गायन, लोकनृत्य, शोभायात्रा, हस्तकौशल्य स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये स्काऊट-गाईड यांनी सहभाग घेतला.शोभायात्रेचे उद्घाटन विद्यानिकेतन आमगावचे प्राचार्य कमलबापू बहेकार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भाऊराव पत्रे, व्ही. डी. मेश्राम, दिनेश रहांगडाले उपस्थित होते.जिल्हा मेळाव्याचा शेवटच्या दिवशी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. स्काऊट-गाईड यांना बक्षीस वितरण करण्यात आले. मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व स्काऊट-गाईड यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, सारिका बांगडकर, माधवी मुरमाडे, तहसीलदार बोरुले, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, शिक्षण विस्तार अधिकारी निलकंठ सिरसाटे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्राचार्य लांजेवार, शिक्षणाधिकारी यु.के.नरड, जिल्हा आयुक्त व्ही.आर.भगत, विद्या खेडुलकर, जी.एस.चिंधालोरे, पी.एस.मेश्राम, संजय आर. बेलोरकर, मनिषा तराळे, बुरडे, रहांगडाले, एम.डब्ल्यु.नंदनवार, तथा मेळावा प्रमुख बावणकर, आर.एस.वैैष्णव व गावकरी उपस्थित होते.