शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

३१ शिक्षण सेवक पुन्हा मैदानात

By admin | Updated: June 19, 2014 23:56 IST

नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकिचा अर्थ लाऊन सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलेले ३१ शिक्षण सेवक आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. १८ जून पासून या शिक्षण

साखळी उपोषण सुरू : पुनर्नियुक्तीची मागणीगोंदिया : नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकिचा अर्थ लाऊन सेवेतून कार्यमुक्त करण्यात आलेले ३१ शिक्षण सेवक आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. १८ जून पासून या शिक्षण सेवकांनी पुन्हा साखळी उपोषण सुरू केले आहे. १४ फेब्रुवारी रोजीचे कार्यमुक्तीचे आदेश परत घेण्यात यावे, १६ आॅगस्ट रोजीचे शिक्षण सेवकांचे आदेश कायम ठेवण्यात यावे व ७ जानेवारी २०१३ पासूनचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदाचे मानधन देण्यात यावे या मागणीला घेऊन या ३१ शिक्षण सेवकांनी ३ मार्च पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. २७ मार्च पर्यंत चाललेल्या त्यांच्या या उपोषणाची पूर्तता तर झाली नाही मात्र मधातच लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून व कायद्याचा मान राखत त्यांनी हे आंदोलन स्थगित केले होते. मात्र प्रशासनाकडून दरम्यानच्या कालावधीत ही त्यांच्या मागण्यांवर लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या ३१ शिक्षण सेवकांनी १८ जून पासून पुन्हा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपल्या आंदोलनाचे मंडप गाडले आहे. मागण्यांची त्वरीत पूर्तता न झाल्यास हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा जे.के.कटरे, कु.एम.के.पटले, आर.आर.कटरे, एफ.Þडी.नागफासे, श्री पारधी, कु. पारधी सह अन्य शिक्षण सेवकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)