शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३०० रूपयांची लाच लिपिकाला भोवली

By admin | Updated: June 28, 2015 01:06 IST

शाळेतील परिचराकडून ३०० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाळेतील कनिष्ठ सहायकास रंगेहात पकडले.

एसीबीकडून अटक : बोंडगावदेवी येथील कार्यवाहीबोंडगावदेवी : शाळेतील परिचराकडून ३०० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाळेतील कनिष्ठ सहायकास रंगेहात पकडले. शुक्रवारी (दुपारी १२ वाजतादरम्यान अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ही कारवाई केली. सविस्तर असे की, तक्रारदार बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद शाळेत परिचर पदावर कार्यरत आहे. त्याच शाळेत कार्यरत कनिष्ठ सहायक आरोपी हितेंद्र तुळशीदास सतदेवे याने तक्रारदारास पगार काढून दिल्याचा मोबदला तसेच तक्रारदाराची पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव येथे बदली झाल्याने कार्यमुक्तीचा आदेश देण्याकरिता ३०० रूपयांची लाच मागीतली. यावर मात्र तक्रारदाराने गुरूवारी (दि.२५) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पथकाने शुक्रवारी (दि.२६) दुपारी १२ वाजता दरम्यान शाळेत सापळा लावला. येथे आरोपी सतदेवे याने पंचांसमक्ष तक्रारदारास काम करून देण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारली. यावर पथकाने आरोपीस ३०० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद धोंगे, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, हवालदार गोपाल गिरीपुंजे, शिपाई रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, योगेश उईके, शेखर खोब्रागडे, वंदना बिसेन, चालक गायधने यांनी यशश्वी केली. (वार्ताहर)