जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र असताना एक-एक रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याने धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी एकूण २१५ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १९० नमुन्यांची आरटीपीसीआर तर २५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.४६ टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४४२६५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२५४३७ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८८२८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी ४०४९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्य स्थितीत ३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
...................
चाचण्यांचे प्रमाण घटले
कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. तर दुसरीकडे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. सध्या दररोज केवळ सरासरी ३०० चाचण्या केल्या जात आहे. काही गावांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचीसुद्धा साथ सुरू आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.