शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात ३ लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:14 IST

आदिवासी विकास महामंडळाने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी ३ लाख २ हजार क्विंटल धान ताडपत्र्यांचा आधार घेवून उघड्यावर पडला आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ दरवर्षी नुकसान तरी धडा नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी विकास महामंडळाने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी ३ लाख २ हजार क्विंटल धान ताडपत्र्यांचा आधार घेवून उघड्यावर पडला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या उघड्यावरील धानाला बसल्याची माहिती आहे.जिल्हा मार्केटिंग फडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाची जिल्ह्यात एकूण शंभर धान खरेदी उघडण्यात आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत ६ लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ३ लाख २ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था केली जाते. मात्र आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी येणारा धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे खरेदी केलेला ३ लाख क्विंटल धान केंद्रावर उघड्यावर पडला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.१७) झालेल्या अवकाळी पावसाचा काही प्रमाणात या धानाला फटका बसला. मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरेदी केंद्रावरील धान ताडपत्र्या झाकून ठेवला असून तो पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा केला. तर या केंद्रावर धान विक्रीस नेणाºया शेतकºयांची धान ओला झाल्याची ओरड आहे. आदिवासी विकास महामंडळातंर्गत मागील पंधरा ते वीस वर्षांपासून धान खरेदी केली जाते. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी दरवर्षी खरेदी केलेला धान उघड्यावर ठेवावा लागतो. याला अवकाळी पावसाचा फटका बसून नुकसान होते. मात्र यानंतरही या विभागाने कुठलाच धडा घेतला नाही.

कोट्यवधी रुपयांचे नुकसानआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान उघड्यावर राहिल्यामुळे आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार देवरी येथे सात वर्षांपूर्वी घडला होता. याची तेव्हा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेतली होती. तेव्हा शासनाने गोदामांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन सुध्दा हवेत विरल्याचे चित्र आहे.

अवकाळी पावसाचा खरेदी केंद्रावरील धानाला फटका बसला नसून धान पूर्णपणे ताडपत्र्या झाकून ठेवला असून धान पूर्णपणे सुरक्षीत आहे.- सुरेश आंबडकर, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ.गोदामांचा प्रस्ताव मंत्रालयातचआदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी केला जाणार धान ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोदामांची व्यवस्था करण्यात यावी.असा प्रस्ताव या विभागाच्या अधिकाºयांनी शासनाकडे पाठविला. मात्र मागील दहा वर्षांपासून या प्रस्तावावर कुठलाच निर्णय न झाल्याने गोदामांचा प्रस्ताव मंत्रालयातच धूळ खात पडला आहे.

टॅग्स :agricultureशेती