शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

३ लाख ५६ हजार पुस्तके उपलब्ध

By admin | Updated: May 25, 2017 00:50 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षासाठी वर्ग १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांची सर्व पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

१ लाख २७ हजार विद्यार्थी लाभार्थी : ७ लाख पुस्तकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षासाठी वर्ग १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांची सर्व पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख २७ हजार २३४ विद्यार्थ्यांसाठी ६ लाख ९७ हजार ९२७ पुस्तकांची मागणी करण्यात आली. आतापर्यंत ५१.८ टक्के पुस्तके म्हणजेचे ३ लाख ५६ हजार ५१६ पुस्तके उपलब्ध झाली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिकणाऱ्या वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत दिली जातात. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २७ हजार २३४ बालकांना त्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तके द्यायची आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाने ६ लाख ९७ हजार ९२७ पुस्तकांची मागणी केली आहे. या पुस्तकासाठी २ कोटी ५२ लाख २० हजार ९९० रुपये लागणार आहेत. यापैकी ५१.८ टक्के पुस्तके म्हणजेच ३ लाख ५६ हजार ५१६ पुस्तके जिल्ह्याला पुरवठा करण्यात आली आहे. आतापर्यंत पुस्तकावर १ कोटी २५ लाख ९७ हजार ९०७ रुपये खर्च केले आहे. जिल्ह्याला आणखी ३ लाख ४१ हजार ४११ पुस्तके लागणार आहेत. त्यासाठी १ कोटी २६ लाख २३ हजार ८३ रुपये लागणार आहेत. पुस्तकांसाठी सडक अर्जुनी तालुक्यासाठी १२ हजार ५९६ विद्यार्थ्यांसाठी ६७ हजार ६४२, अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी १६ हजार ६६१ विद्यार्थ्यांसाठी ९१ हजार ६५१, देवरी तालुक्यासाठी १२ हजार ५३० विद्यार्थ्यांसाठी ६७ हजार ६६७, तिरोडा तालुक्यासाठी १७ हजार ६४ विद्यार्थ्यांसाठी ९४ हजार २२२, गोंदिया तालुक्यासाठी ३६ हजार ८४ विद्यार्थ्यांसाठी २ लाख ७२९, गोरेगाव तालुक्यासाठी ११ हजार ८४१ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार ४२, आमगाव तालुक्यासाठी ११ हजार ३८१ विद्यार्थ्यांसाठी ६२ हजार ४२४, सालेकसा तालुक्यासाठी ९ हजार ७७ विद्यार्थ्यांसाठी ४९ हजार ५५० पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. यंदा इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. २७ जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून पुस्तक दिवस साजरा केला जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच सर्व विद्यार्थ्यांसाठी पुरेशी पुस्तके उपल्बध करण्याचा माणस सर्व शिक्षा अभियानाचा आहे. यासाठी शिक्षा अभियानाचे कर्मचारी सतत पाठपुरावा करीत आहेत.पुढच्या वर्षी पुस्तकांचे पैसे खात्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. त्या गणवेशाचे पैसे यंदापासून विद्यार्थी व आईच्या संयुक्त खात्यात टाकले जात आहेत. तसेच पुढच्या वर्षीपासून म्हणजेच सन २०१८-१९ या सत्रापासून विद्यार्थी आईच्या संयुक्तरित्या असलेल्या खात्यात पुस्तकांचे पैसे टाकले जाणार आहेत. कोणत्याही लाभार्थी विद्यार्थ्यांने बाजारातून पुस्तके खरेदी करु नये. शाळा सुरु होईपर्यंत मराठी, हिंदी, सेमी इंग्रजी, इंग्रजी व उर्दू या माध्यमाची पुस्तके उपलब्ध करून होणार आहेत. उल्हास नरड, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.गोंदिया