शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी ठरले आतापर्यंत 3 ‘गोल्डन डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

कोरोनाचा कहर जिल्ह्यात जरी नियंत्रणात असला तरी आजही काही जिल्हे व राज्यांमध्ये त्याचा तांडव सुरूच आहे. यामुळे आजही कोरोनामुळे दररोज काही ना काही अप्रिय घटना कानी पडतच आहेत. कोरोनाच्या या ग्रहणामुळे आज सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली असून त्यांना या भीतीतच एक-एक दिवस मोजत घालवावा लागत आहे. दुसऱ्या लाटेची भीती कमी होत नाही तोच आता तिसऱ्या लाटेच्या बतावण्या सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देतिसऱ्यांदा शून्य बाधितांची नोंद : २८ जानेवारी, ४ जुलै व १३ जुलै शुभ दिवस

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने कहर सुरू केला व त्याचे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहेत. दररोज निघणाऱ्या नव्या दिवशी कोरोनामुळे काही ना काही अप्रिय घटनाच पुढे येत असल्याचा सर्वांचाच अनुभव आहे. मात्र, एढ्यातही जिल्हावासीयांना ३ सुखद धक्के मिळाले आहेत. त्यात २८ जानेवारी, ४ जुलै व त्यानंतर आता १३ जुलैला जिल्ह्यात शून्यबाधिताची नोंद घेण्यात आली असून हे ३ दिवस जिल्ह्यासाठी ‘गोल्डन डे’ ठरले आहेत.कोरोनाचा कहर जिल्ह्यात जरी नियंत्रणात असला तरी आजही काही जिल्हे व राज्यांमध्ये त्याचा तांडव सुरूच आहे. यामुळे आजही कोरोनामुळे दररोज काही ना काही अप्रिय घटना कानी पडतच आहेत. कोरोनाच्या या ग्रहणामुळे आज सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली असून त्यांना या भीतीतच एक-एक दिवस मोजत घालवावा लागत आहे. दुसऱ्या लाटेची भीती कमी होत नाही तोच आता तिसऱ्या लाटेच्या बतावण्या सुरू झाल्या आहेत.या भीती वाढविणाऱ्या घटनांसोबतच मात्र जिल्हावासीयांना काही सुखद घटनांचे धक्केही बसत आहेत ही दिलासादायक बाब आहे. त्याचे असे की, मागील वर्षी कोरोनाने कहर केल्यानंतर दररोज बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच २८ जानेवारीला जिल्ह्यात शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली व पहिला सुखद धक्का जिल्हावासीयांना बसला. त्यानंतर  आता ४ जुलैला हीच गूड न्यूज जिल्हावासीयांना मिळाली असतानाच मंगळवारी (दि.१४) जिल्ह्यात तिसऱ्यांदा शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यासाठी हे ३ दिवस ‘गोल्डन डे’ ठरले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर- सुदैवाने जिल्ह्यात मंगळवारी फक्त १४ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात शून्य बाधितांची नोंद घेण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढली नसून उलट ६ बाधितांची सुटी झाल्याने क्रियाशील रुग्णसंख्या घटली आहे. त्यात तिरोडा तालुका कोरोनामुक्त असून उर्वरित अन्य तालुक्यांत आता २-३ रुग्ण उरले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे.तिसरी लाट थोपविण्यासाठी नियम पाळा- जिल्हावासीयांच्या संयमामुळे जिल्ह्यातून दुसरी लाट ओसरली असून आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. जिल्हावासीयांना प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असल्याने आपल्या जिल्ह्याला या ग्रहणापासून वाचविण्यासाठी जिल्हावासीयांना आताही नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या