शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावर शिष्यवृत्तीची २९५ प्रकरणे ‘पेंडिंग’

By admin | Updated: August 3, 2015 01:29 IST

आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू व मागासलेल्या वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना (जीओआयएस) राबविते.

सन २०१४-१५ : वर्षभरात ३१ हजार ६०८ प्रकरणांची नोंदगोंदिया : आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू व मागासलेल्या वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना (जीओआयएस) राबविते. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, परंतु शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची सोय होते. मात्र ३१ जुलै पर्यंत जिल्हास्तरावर एकूण २९५ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत सरकारच्या या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात एकूण ३१ हजार ६०८ अर्जांची नोंदणी करण्यात आली. यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे ७ हजार ६१३, विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) १ हजार ६५८, व्हीजेएनटी १ हजार ८९७, ओबीसी २० हजार ४४० अर्जांचा समावेश आहे. तर जिल्हास्तरावर एकूण २९५ प्रकरणे अद्याप विचाराधीन आहेत. यात अनुसूचित जातींची १०६, एसबीसी १४, व्हीजेएनटी ४४ व ओबीसींच्या १३१ अर्जांचा समावेश आहे. याशिवाय महाविद्यालयीनस्तरावर एकूण ७८७ अर्ज विचाराधीन आहेत. यात अनुसूचित जातींचे १४८, एसबीसी ३९, व्हीजेएनटी ४४ व ओबीसींच्या ५५२ अर्जांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण ४०० अर्ज स्वीकृत (अप्रूव्हड) करण्यात आले आहेत. यात अनुसूचित जातीचे ३१, एसबीसी २२, व्हीजेएनटी तीन व ओबीसींच्या ३४४ अर्जांचा समावेश असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)फ्री शिपचे १ हजार ३०७ अर्ज स्वीकृतसन २०१४-१५ मध्ये फ्री शिपसाठी १ हजार ५८२ अर्जांची नोंदणी झाली. यात अनुसूचित जातीचे ३६७, एसबीसी ८७, व्हीजेएनटी १०१ व ओबीसींच्या १ हजार २७ अर्जांचा समावेश आहे. तर स्वीकृत झालेल्या अर्जांमध्ये अनुसूचित जातीचे ९५९, एसबीसी ७६ व व्हीजेएनटी २७२ अशा एकूण १ हजार ३०७ अर्जांचा समावेश आहे. शिष्यवृत्ती व फ्रीशिपची अस्वीकृत प्रकरणेभारत सरकारच्या शिष्यवृत्तीची (जीओआयएस) एकूण पाच प्रकरणे अस्वीकृत करण्यात आली. यात अनुसूचित जातीची दोन, एसबीसी एक व ओबीसींच्या दोन प्रकरणांचा समावेश आहे. तसेच फ्रीशिपची एकूण ४९ प्रकरणे अस्वीकृत करण्यात आली आहेत. यात अनुसूचित जातींची १५, एसबीसी पाच, व्हीजेएनटी एक व ओबीसींच्या एकूण २८ प्रकरणांचा समावेश आहे. जिल्हा व महाविद्यालयस्तरावर फ्रीशिपचे अर्ज विचाराधीनजिल्हास्तरावर फ्रीशिपचे एकूण २ हजार ९२९ अर्ज विचाराधीन आहेत. यात अनुसूचित जातीचे एक हजार १९७, एसबीसी १४३, व्हीजेएनटी ६८९ व ओबीसींच्या ९०० अर्जांचा समावेश आहे. तसेच महाविद्यालयीनस्तरावर एकूण ११ हजार २२२ अर्ज विचाराधीन (प्रलंबित) आहेत. यात अनुसूचित जातींचे ३ हजार ७३३, एसबीसी ७२३, व्हीजेएनटी ६९२ व ओबींच्या ६ हजार ७४ अर्जांचा समावेश आहे.