शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

२९४ संस्था अवसायनात !

By admin | Updated: September 4, 2015 00:04 IST

मागील अडीच दशकात सहकार क्षेत्रात विविध संस्थांचा उदय झाला. सहकार क्षेत्राला सक्षम आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने शहरी, ...

नेक संस्था बंद सर्वेक्षणात कागदोपत्री संस्थांचे काम उघडकीसभंडारा : मागील अडीच दशकात सहकार क्षेत्रात विविध संस्थांचा उदय झाला. सहकार क्षेत्राला सक्षम आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने शहरी, नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात हजारो सहकारी संस्था उघडण्यात आल्या. मात्र यातील हजारो संस्थांचे केवळ कागदावरच राहिल्या. यात भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर २९४ सहकारी संस्था बंद स्थितीत दिसून आले आहे. सहकार विभागाने या सर्वच २९४ सहकारी संस्थांना अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश जारी केले आहे. सहकार आयुक्तांनी परिपत्रक जारी करुन राज्यातील २ लाख ३०,९२५ नोंदणीकृत संस्थांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून सर्वेक्षण ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.भंडारा तालुक्यात ११५ संस्था बंदभंडारा जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत १,३६३ सहकारी संस्थांची नोंदणी झालेली होती. त्यापैकी २९४ संस्था अवसायनात असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ४० सहकारी संस्थांमधून पाच संस्था अवसायनात आहेत. त्यापैकी एक बंद संस्थेला अंतिम आदेश जारी करण्यात आले आहे. चार संस्थांसाठी अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यात भंडारा तालुक्यातील ११५ सहकारी संस्था अवसायनात असून तुमसर तालुक्यातील ४७, मोहाडी तालुक्यातील ४२, लाखनी तालुक्यातील १२, साकोली तालुक्यातील २३, पवनी तालुक्यातील २० आणि लाखांदूर तालुक्यातील २७ सहकारी संस्था अवसायनात असल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना अंतिम आदेश जारी केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)भंडारा जिल्ह्यात २९४ सहकारी संस्था अवसायनात आढळून आल्यानंतर १ जुलैपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले. १,०६९ सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाअंतर्गत ६२५ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के सर्वेक्षणाचे काम झाले आहे. सर्वेक्षणासाठी तीन ते सात कर्मचाऱ्यांचे एकूण सात चमू गठित करण्यात आले आहे. सहकारी संस्थांचे काम प्रत्यक्षात सुरू आहे किंवा नाही याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.- अजय कडू, जिल्हा उपनिबंधक, भंडारा.पवनीत दोन विणकर संस्था बंदपवनी तालुक्यातील दोन विणकर संस्था बंद आहेत. मोहाडी तालुक्यातील एक आणि साकोली तालुक्यात दोन संस्थांना जूनमध्ये अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश जारी केले आहे. राज्य सरकारच्या आदेशाने जिल्ह्यात १ जुलैपासून सहकारी संस्थांचे सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात ५० सहकारी संस्था कागदोपत्री आढळून आल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात कार्यरत सहकारी संस्थांची एकूण संख्येच्या तुलनेत २५ टक्के संस्था सहकार मूळ उद्देशापासून दूर आहेत.२० ठिकाणी अवसायकाने सांभाळला पदभारभंडारा जिल्ह्यात २९४ संस्था अवसायनात असल्यामुळे त्यांचे काम बंद आहे. यात २० सहकारी संस्थांचा पदभार अवसायकने सांभाळला आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यक्षेत्रात एका संस्थेचा पदभार अवसायकने सांभाळला असून तुमसर तालुक्यात सर्वाधिक आठ संस्थांचा पदभार अवसायकने स्वत:कडे ठेवला आहे. मोहाडी तालुक्यात तीन, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी एक आणि पवनी तालुक्यात सहा सहकारी संस्थांचा पदभार अवसायकने सांभाळला आहे.